IMPIMP

Pune Riverfront Development Project | पुण्यातील ’या’ मोठ्या प्रकल्पात शरद पवारांनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घातले लक्ष

by nagesh
Pune Riverfront Development Project | cm uddhav thackeray pune riverfront development project sharad pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील बहुचर्चित नदीकाठ सुधार प्रकल्पाचे (Pune Riverfront Development Project) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भूमिपूजन केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी या प्रकल्पाचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यावरणप्रेमींनी (Environmentalist) देखील या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) महापालिका (Pune Municipal Corporation) अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण (MP Adv. Vandana Chavan) यांनी ही माहिती दिली (Pune Riverfront Development Project).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असून त्यांच्याच जिल्ह्यात थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, शरद पवार यांना पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विनंतीनुसार राज्य सरकारने (Maharashtra State Government) यात लक्ष घातले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे या प्रकल्पाचा (Pune Riverfront Development Project) आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण…
या सर्व घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) नदीकाठ सुधार प्रकल्प (Pune Riverfront Development Project) प्रचाराचा केंद्रबिदू ठरू शकतो.
यासंदर्भात खासदार वंदना चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीची माहिती दिली.
वंदना चव्हाण म्हणाल्या, प्रकल्पाला आमचा विरोध नाही; पण महापालिकेने समाधानकारक उत्तरे दिलेली नाही.
त्यातील त्रुटी दूर करूनच हा प्रकल्प झाला पाहिजे.

प्रकल्पाच्या दोन निविदांना मंजुरी
सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी नदीकाठ सुधारणा प्रकल्पांतर्गत मुळा – मुठा (Mula – Mutha River) या दोन्ही नद्यांच्या काठांचा विकास करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले होते.
नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या दोन निविदांना मंजुरी देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केली शंका
पुण्यातील या बहुचर्चित नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पाचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्याच्या जलसंपदा विभागाने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकेच्या अनुषंगाने महापालिकेला सादरीकरण करण्याचे आदेश दिले होते.

हे सादरीकरण करताना महापालिकेकडून (PMC) जो खुलासा करण्यात आला तो समाधानकारक नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
म्हणूनच आता मुख्यमंत्री ठाकरे आढावा घेणार आहेत, असे खा. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

महापालिकेचा दावा चुकीचा
पत्रकार परिषदेत प्रदीप घुमारे यांनी म्हटले की, मेट्रो (Pune Metro) व ई – बसेसमुळे (E – Bus) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
त्यामुळे येथे खासगी वाहने कमी होतील, असा महापालिकेचा दावा असताना पंचवटी ते पाषाण रस्त्यासाठी वेताळ टेकडी फोडून तयार केला जाणारा बोगदा नेमका कशासाठी आहे.
तसेच हा बोगदा झाल्याने वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा महापालिकेचा दावाही चुकीचा आहे, असे घुमारे यांनी म्हटले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोथरूड, कर्वेनगरमध्येच सर्व मोठे प्रकल्प का ?
पंचवटी ते पाषाण रस्त्यासाठी (Panchavati to Pashan Road) वेताळ टेकडी फोडून जो बोगदा तयार केला जाणार आहे, त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल.
वेताळ टेकडीचा परिसर हा शहराचा मोठा जलाशय असल्याने या ठिकाणाला धक्का लावणे योग्य नाही.
कोथरूड (Kothrud), कर्वेनगर (Karvenagar) या तीन चौरस किलोमीटरच्या परिसरातच सगळे मोठे प्रकल्प का आणण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

 

Web Title :- Pune Riverfront Development Project | cm uddhav thackeray pune riverfront development project sharad pawar

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

Maharashtra Local Body Election | महाराष्ट्रातील महापालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार ? 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

Related Posts