Pune Rural Police | मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरी करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद ! कारमधून येऊन चोरत असे बॅटर्या, 28 बॅटरीसह कार हस्तगत

पुणे : Pune Rural Police | नारायणगाव, आळे फाटा परिसरात रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या मालवाहतूक करणार्या वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या होत्या. चोरीची घटनेचा वेळ व ठिकाणाची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधुन येणार्या चोरट्याला पकडले. (Arrest In Theft Case)
केतन रोहिदास विधाटे (वय २४, रा. धालेवाडी, ता. जुन्नर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यातील चोरीच्या २८ बॅटरी त्याच्याकडील कारमध्ये मिळून आल्या. पोलिसांनी ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांच्या २८ बॅटरी व कार असा माल जप्त केला आहे. त्यात नारायणगावमधील ५ तर आळेफाटा येथील २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
केतन विधाटे हा कारमधून येत व बॅटरी चोरी करुन त्याच वाहनातून बॅटरी घेऊन जात होता. त्याचा शोध घेत असताना तो १५ जानेवारी रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेवाडी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी त्याला कारसह पकडले. अधिक तपासासाठी त्याला नारायणगाव पोलिसांच्या हवाली केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरीयांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, राजु मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, निलेश सुपेकर यांनी केली आहे.
Comments are closed.