Pune Rural Police News | दोघा गुंडांकडून 5 गावठी पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे जप्त ! ग्रामीण पोलिसांनी महिन्याभरात 17 पिस्तुले व 29 जिवंत काडतुसे केली जप्त (Video)

पुणे : Pune Rural Police News | गावठी कट्टे कमरेला लावून फिरणार्या दोघांना शिरुर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ५ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अनिकेत विलास गव्हाणे (वय २०, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गावठी पिस्तुलाची विक्री करुन जास्त पैसे कमविता येतील, या कारणावरुन त्यांनी एक महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून पाच पिस्तुले आणल्याचे सांगितले. अनिकेत गव्हाणे याच्याविरुद्ध शरीराविरुद्ध एक गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
शिरुरनजीक बायपास रोडलगत असणारे दि स्पॉट नाना हॉटेलजवळ दोघे जण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. त्यानुसार शिरुर पोलिसांनी (Shirur Police) दोघांना पकडले. अनिकेत गव्हाणे यांच्या कमरेला दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे तर मंगेश खुपटे याच्या कमरेला तीन पिस्तुले व २ जिवंत काडतुसे आढळून आली.
याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (SP Pankaj Deshmukh) यांनी सांगितले की, सप्टेबर २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखा, शिरुर पोलीस ठाणे, शिक्रापूर पोलीस ठाणे, वालचंदनगर पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाणे व हवेली पोलीस ठाण्याकडून गावठी पिस्तुल बाळगणारे व विक्री करणार्यांवर कारवाई करुन एकूण १७ पिस्तुले व २९ जिवंत काडतुसे जप्त करुन मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, विजय शिंदे, परशुराम सांगळे, निरज पिसाळ, निखील रावडे, रधुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे.
Comments are closed.