IMPIMP

पुण्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद; कोरोनामुळे आज रात्रीपासून कडक निर्बंध

by pranjalishirish
Pune schools closed till March 31; Strict restrictions from tonight due to corona - divisional commissioner saurabh rao

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. देशात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत, त्यामध्ये पुणे Pune शहराचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यामध्ये  Pune काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या पुण्यामध्ये Pune लॉकडाउन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. तसेच कोविडच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या बंद राहतील ?
३१ मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. पण १० वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. तसेच सर्वेक्षण आणि Contact Tracing देखील सुरू करण्यात येणार आहेत. पालकमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत हे निर्बंध निश्चित करण्यात आले. या निर्बंधांनुसार, रात्री १० नंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद करण्यात येतील. तसेच ते एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच त्यांची सेवा देऊ शकतात. तसेच पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात येणार आहे.

पुण्यात Pune  रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध लागू राहणार आहेत. तसेच विविध ठिकाणच्या बागा एक टाइम म्हणजचे फक्त सकाळी चालू ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. मॉल्स आणि सिनेमागृह रात्री दहा वाजताच बंद करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांना उभे राहता येणार नाही. तसेच सोसायटीतील क्लब हाउसदेखील बंद करण्यात येणार आहे. तसेच लायब्ररीमध्येदेखील ५० टक्के लोकांची उपस्थिती ठेवण्यात येणार आहे. तसेच ऑफिस आपापल्या वेळेनुसार चालू राहणार आहेत. राज्यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये एकट्या पुण्यामध्ये १८४७४ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यानंतर अनुक्रमे नागपूर, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts