Rajendra Bhosale On Pune Rains | शनिवारच्या पावसामुळे शहर जलमय झाल्याची महापालिका आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

पुणे : Rajendra Bhosale On Pune Rains | जोरदार पावसानंतर शहरात र्निमाण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार रहा, नागरीकांचे फोन येण्याची वाट पाहत बसु नका, रिस्पॉन्स टाईम हा कमी झाला पाहीजे अशा कडक सुचना महापालिका (Pune Municipal Corporation) आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. यामुळे प्रशासनावर सर्वच स्तरावरून जोरदार टिका होऊ लागली आहे. भाजप, मनसे, शिवसेना , कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त भोसले यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. यामुळे बुधवारी आयुक्त भोसले यांनी सर्व खाते प्रमुख, उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेऊन कडक सुचना केल्या आहेत. सुमारे तीन तास ही बैठक चालली होती. (Pune PMC News)
या बैठकीविषयी आयुक्त भोसले म्हणाले, सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना त्यांच्या भागातील नालेसफाईचा आढावा घेण्यास सांगितले आहे. संबंधित ठेकेदाराकडून उर्वरीत कामे करुन घेण्याचे आदेश दिले आहे. पावसाळा संपेपर्यंत काम करण्याची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे. त्यादृष्टीने पाहणी करून कामे करून घ्या, अशा सुचना दिल्या आहेत. झाडे पडण्याच्या घटना कमी करण्यासाठी फांद्या छाटणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.
या बैठकीत क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य खाते यांच्यात समन्वय वाढविणे, पुढील काळात प्रतिबंधित उपाययोजना काय करता येतील यावरही चर्चा झाली. गेल्या आठवड्यात पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्रात काय करता येईल याविषयी चर्चा झाली असल्याचे नमूद करीत डॉ. भोसले म्हणाले, क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्याकडील उपलब्ध मशीनरी, साधन सामुग्री याची माहीती घेण्यास सांगितले असुन, त्यानुसार ते उपलब्ध करून द्यावे, तसेच वेळ पडली तर खरेदी करावी अशा सुुचना केली आहे. संपुर्ण पावसाळ्याच्या कालावधीत क्षेत्रिय कार्यालयांनी मुख्य खात्याच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. तसेच संबंधित भागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, त्यांनी केलेल्या सुचनानुसार कामे पुर्ण करावीत, यातुन पुढील काळात निर्माण होणार्या आत्पकालीन परिस्थितीला तोंड देण्याची तयारी झाली पाहीजे. नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याची ठिकाणांविषयी विशेष काळजी घ्यावी, तेथे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
क्षेत्रीय अधिकारीच नोडल ऑफिसर
महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारीच या पावसाळ्याच्या कालावधीत नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या संपर्कात रहावे, क्षेत्रीय कार्यालयास हवी ती साधन सामुग्री , तांत्रिक सहकार्य करण्याची जबाबदारी ही सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
Comments are closed.