Rajesh Bansode SP | पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर

पुणे : Rajesh Bansode SP | पुण्यातील पाषाण येथील बिनतारी संदेश विभागाच्या मुख्यालयातील पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
राजेश बनसोडे हे १९९८ च्या बॅचचे पोलीस उपविभागीय अधिकारी असून सध्या ते पोलीस अधीक्षक म्हणून बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मुख्यालयात कार्यरत असताना त्यांनी संपूर्ण राज्यातील बिनतारी संदेश यंत्रणेतील बंदोबस्ताची सुपरव्हिजन केले. मनुष्यबळाचे आणि यंत्रसाम्रुगीची वितरण यावर राज्य नोडल अधिकारी म्हणून देखरेख ठेवली. अगदी रिमोट एरियामध्ये बिनतारी यंत्रणा व्यवस्थित काम करेल, याकडे लक्ष दिले.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून २०१९ – २०२२ दरम्यान काम पाहताना सलग तीन वर्षे पुणे विभागात कारवाईत राज्यात प्रथम होता. त्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांकडून प्रशंसा केली गेली होती. पुणे शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनेक सोनसाखळी चोरी, रॉबरी, खून, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा अनेक गुन्हे यशस्वीपणे उलघडले़ खडक पोलीस ठाण्यातील ४ कोटी ७६ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यातील सर्व रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले होते.
खैरलांजी या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी तुमसर येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यात राजेश बनसोडे यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर जिल्ह्यातील भिवंडी आणि पडघा येथे कायदा सुव्यवस्था परिणामकारकरित्या राखली होती. राजेश बनसोडे यांच्या पद्धतशीर, सूक्ष्म नियोजन आणि मेहनतीमुळे राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे पोलीस पदक मिळाले आहे.
Comments are closed.