Ravindra Dhangekar | अखिल भारतीय मराठा महासंघाचा आ. रवींद्र धंगेकरांना पाठींबा; बाळासाहेब मालुसरे यांनी पत्राद्वारे कळवले
पुणे : Ravindra Dhangekar | मराठा समाजाच्या (Marath Samaj) हितासाठी काम करणारे व मराठा योद्धा “मनोज जरांगे” (Manoj Jarange Patil) यांच्या बरोबर मराठा आरक्षणात (Maratha Reservation) सक्रीय असणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे (Akhil Bhartiya Maratha Mahasangh) आम्ही कार्यकर्ते मा. आ. रवींद्र धंगेकर यांस संघटनेच्या वतीने स्थानिक मराठा पुणेकर (Maratha Punekar) म्हणून पाठींबा देत आहोत. या आगोदर संघटनेने घेतलेला निर्णय आम्हाला विचारात न घेता प्रसिद्ध केलेला आहे, तो आम्हा स्थानिकांना मान्य नाही.
भारताची राजधानी दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरु असताना महासंघाच्या वतीने जंतर मंतर येथे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबद्दल तमाम मराठा समाज्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परंतु सत्तारूढ खासदारांनी वाटण्याच्या अक्षदा आंदोलनास लावल्या.
पुणे शहरात मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या वेळेस जे कार्यकर्ते उपोषणास बसले असता रवींद्र धंगेकर हे पुण्याचे व शासनाचे प्रतिनिधी म्हणून या उपोषणास उपस्थित होते व जाहीर पाठींबा दिला. तसेच मराठा योद्धा “मनोज जरांगे” यांच्यावर शासनाने SIT चौकशी लागू नये म्हणून निदर्शने करणारा एकमेव आमदार रवींद्र धंगेकर हे होते. वेळोवेळी पक्ष जात हा भेद न बघता काम करणाऱ्या बहुजनांचा व सर्वसामान्यांचा नेता जातीने नव्हे नीतीने मराठा असलेले मा. रवींद्र धंगेकरांस आम्हा सर्वसामान्य मराठ्यांचा जाहीर पाठींबा देत आहोत असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे (Balasaheb Malusare) यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
Comments are closed.