Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकरांच्या विजयाचं गणित नेमकं कुठं चुकलं? ‘ही’ आहेत धंगेकरांच्या पराभवाची कारणे…
पुणे: Ravindra Dhangekar | राज्यातील प्रतिष्ठेचा पुणे लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश मिळाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरे (Vasant More) यांच्यात तिरंगी लढत झाली.
या निवडणुकीत भाजपाच्या मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ विजयी झाल्यानंतर धंगेकरांचे नेमके चुकले काय ? याबाबत मतमतांतरे होऊ लागली आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टॉन्मेंट आणि कसबा पेठ असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
यापैकी शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसबा पेठेमध्ये स्वत: रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. हे पक्षीय बलाबल पाहता मोहोळ सहज विजयी झाले आहेत.
कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ ७४ हजार ४०० तर पर्वतीमध्ये २९ हजारांची आघाडी मोहोळ यांना मिळाली. पुणे कॅन्टोन्मेंट मधून रविंद्र धंगेकर यांना १६ हजारांचे लीड मिळाले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सामना जवळपास बरोबरीत सुटला असल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी अवघे ३ हजारांचे लीड मोहोळ यांना घेता आले. तर कसब्यात मोहोळ यांना १५ हजारांचे तर वडगावशेरी येथे १४ हजारांचे लीड मिळाले आहे. पुणे शहरात मनसेची ही काही मते आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता. तसेच त्याबाबत त्यांची पुण्यातही एक सभा पार पडली होती.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला धंगेकर यांनी खिंडार पाडलं होतं. धंगेकर पुणे लोकसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करतील अशी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या समर्थकांना आशा होती. पण, त्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही.
पुणे लोकसभेच्या इतर कोथरूड, वडगावशेरी, पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना आघाडी मिळाली. कोथरूड आणि पर्वती विधानसभा लोकसभा मतदार संघात मिळालेले मोठे मताधिक्य मोहोळ यांच्यासाठी महत्वाचे ठरले.
Comments are closed.