IMPIMP

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

by nagesh
Sanjay Kakade become State Vice President of bjp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – माजी खासदार संजय काकडे (sanjay kakade) यांच्यावर भाजपनं आता मोठी जबाबदारी सोपविली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय काकडे यांची आता प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काकडे यांना दिलं आहे. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन माजी खा. काकडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. गतवेळी मनपा निवडणूकीत भाजपला मोठ यश मिळालं होतं. त्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी मनपामध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते.

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी माजी खासदार काकडे sanjay kakade यांनी केलेले कार्य तसेच संसदेत काकडे यांचे कार्य उल्लेखनीय आणि अभिनंदनीय असल्याचं भाजपनं म्हंटलं आहे. काकडे sanjay kakade यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटना वाढविण्यासाठी निश्चितपणे होईल असं देखील भाजपानं म्हंटलं आहे.

Also Read :

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Related Posts

Leave a Comment