Sassoon Hospital | ससून रुग्णालयातून आणखी एक प्रताप समोर; अधीक्षक यलप्पा जाधवांवर कारवाई होणार?
पुणे: Sassoon Hospital | मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण (Drug Mafia Lalit Patil Case), कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील (Kalyani Nagar Car Accident Pune) रक्त नमुन्यात केलेले बदल (Blood Sample Tampering Case), काल -परवाच ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी अनेक प्रकरणे सांगता येतील. त्यातच आता ससून रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव यांची नियुक्ती वादात सापडली आहे. जाधव हे सह प्राध्यापक असतानाही त्यांना ससूनचे अधीक्षक बनवण्यात आले. पात्रता नसताना देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी जाधव यांच्यावर वरदहस्त कोणाचा असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव (Yallappa Jadhav) हे सह प्राध्यापक आहेत. सह प्राध्यापक असताना त्यांना अधीक्षक करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ८ मे २०२४ रोजी एक जीआर काढला नुसार हॉस्पिटलच्या अधीक्षक पदी एनएमसी गाईडलाईन नुसार प्राध्यापक या पदाची व्यक्ती अधीक्षक असणे गरजेचे आहे.
त्यानुसार ससूनसारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी गेले दोन महिने होऊन सुद्धा सह प्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर ही व्यक्ती कार्यरत आहे. एकीकडे सरकार एनएमसी गाईडलाईन्सचा आधार घेऊन जीआर काढते आणि दुसरीकडे पात्रता नसलेली व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मर्जीतली व्यक्ती, त्या पदावर कार्यरत ठेवते ही गोष्ट ससून रुग्णालय आणि प्रशासनासाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे.
बेवारस रुग्णाबाबत अमानवी कृत्य करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले मात्र हा डॉक्टर कोणत्याही प्रकारचा अधिकारी नसून रेसिडेंट डॉक्टर आहे. अशा घटनेला ससूनचे अधीक्षक, विभाग प्रमुख हे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.