IMPIMP

Sharad Pawar-Ajit Pawar | बारामतीत राजकीय घडामोड! आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली

Sharad Pawar-Ajit Pawar | Political developments in Baramati! Now both nationalists are moving to unite

पुणे :   Sharad Pawar-Ajit Pawar | सध्या महाराष्ट्रात राजकीय सलोख्याचे वारे जोरात वाहत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात युतीची चर्चा सुरू असतानाच, वेगळे झालेले पवार काका-पुतणेही एकत्र येतील का, याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, एक महत्त्वाची घटना समोर आली आहे.

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे. २२ जूनला माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडेल. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार, अजित पवार एकत्र येणार का, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील एक प्रमुख साखर उत्पादन केंद्र आहे, ज्याने शेती मालकांनासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.

दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडील २१ पैकी पवार गटाने ६ जागा मागितल्याची चर्चा आहे. अजित पवार ६ पैकी किती जागा देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच, आज अजित पवारांच्या पॅनेलची अंतिम यादी जाहीर होईल. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.