IMPIMP

Shrirang Barne On Ajit Pawar NCP | श्रीरंग बारणेंची नाराजी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, माझे काम केले नाही, अजितदादांना यादी… (Video)

by sachinsitapure

पुणे : Shrirang Barne On Ajit Pawar NCP | राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना माझे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी माझे काम केले. मात्र राष्ट्रवादीचा जो खालचा कार्यकर्ता आहे, त्याने महायुतीचा धर्म पाळला नाही. काही ठिकाणी माझे काम केले नाही. या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली होती, अशी नाराजी मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

श्रीरंग बारणे यांनी म्हटले की, पण राष्ट्रवादीच्या शंभर टक्के कार्यकर्त्यांनी माझे काम केले असते तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही वाचले नसते. मावळमधील (Maval Lok Sabha) सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असून त्यांनी माझे चांगल्या पद्धतीने काम केले.

माझ्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पनवेल (Panvel Vidhan Sabha) ही दोन मोठी महानगरे आहेत. येथे महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. उबाठा गटाची येथे ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील (Chinchwad Vidhan Sabha) ३ लाख २२ हजार मतदानापैकी मला २ लाखांपेक्षा जास्त मते पडतील आणि तिथे मला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य राहील, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

पनवेल विधानसभा मतदारसंघात मला १ लाख ७० हजार मते पडतील. तेथील मताधिक्य ७० हजारांपेक्षा अधिक असेल. हे मताधिक्य समोरचा उमेदवार कुठेच कमी करू शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्याने माझा विजय होईल, असे श्रीरंग बारणे म्हणाले.

बारणे म्हणाले, पार्थ पवारांनी (Parth Pawar) त्यांच्या सहकाऱ्यांना मला मदत करण्यास सांगितले होते. त्यांच्याकडून कोणतेही चुकीचे काम झाले नाही.

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मी दारु पितो, पप्पांनीच मला गाडी दिली’ आरोपी मुलाचा कबुली जबाब

Related Posts