Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन कर्जासाठी बोगस कागदपत्रे देऊन बँकेची 17 लाखाची फसवणूक

Cheating Fraud Case
May 18, 2024

पुणे : – Sinhagad Road Pune Crime News | वाहन खरेदीसाठी शोरुमची बनावट कागदपत्रे (Fake Documents) देऊन एकाने भारती सहकारी बँकेच्या वडगाव धायरी शाखेची (Bharti Sahakari Bank Vadgaon Branch) 17 लाख 54 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार 17 मे 2023 पासून 17 मे 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बँकेचे व्यवस्थापक विजय भागवत कदम (वय-48) यांनी शुक्रवारी (दि.17) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चैतन्य श्रीकांत नाईक Chaitanya Shrikant Naik (रा. 675 तुकाईनगर गणेश मंदिराजवळ, सिंहगड रोड, वडगाव ब्रु., पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैतन्य नाईक याने न्यु जीप कंपास स्पोर्ट मॉडेल खरेदीकरता बंडगार्डन येथील आयसीआयसीआय या बँकेच्या शाखेत स्काय मोटो ऑटोमोबाईल्स प्रा. लि. कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून भारती सहकारी बँकेच्या वडगाव शाखेतून वाहन कर्जासाठी 17 लाख 54 हजार 616 रुपयांचे कर्ज घेतले.

आरोपी चैतन्य नाईक या पैशातून वाहन खरेदी न करता बँकेने दिलेल्या पैशांचा अपहार केला. तसेच बँकेला चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 12 के.टी. 1975 या वाहनाचे महाराष्ट्र शासनाचे बनावट कागदपत्र दिले. तसेच याच कागदपत्राच्या आधारे भारती सहकारी बँकेसह पर्यायाने प्रादेशिक परिवहन विभाग पुणे यांची देखील फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

High Cholesterol Symptoms | हाय कोलेस्ट्रॉलच्या ‘या’ 4 संकेतांकडे कधीही करू नका दुर्लक्ष, लाईफ रिस्क टाळा