IMPIMP

Social Media Influencer Mau Missing | पुणे : मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली ‘इन्ल्फूएन्सर’ बेपत्ता, घरात ‘सुसाईड नोट’ सापडल्याने खळबळ

June 18, 2024

पुणे :  – Social Media Influencer Mau Missing | इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोअर्स असलेली पुण्यातील एक सोशल मीडिया ‘इन्ल्फूएन्सर’ 15 जून पासून बेपत्ता झाली आहे. तीने घरात सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवत कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मयूरी चैतन्य मोडक-पवार Mayuri Chaitanya Modak-Pawar (वय-26 रा. सदाशिव पेठ, पुणे) असं बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. मयूरी पवार सोशल मिडीया ‘इन्ल्फूएन्सर’ असून ती ‘माऊ’ नावाने प्रसिद्ध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयुरीला वडील नसल्याने ती आईसोबत राहते. तिच्या सोशल मीडियाची सुरुवात ‘टिक टॉक’ वरुन सुरु झाली होती. या ठिकाणी तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिचे लाखो फॉलोवर्स तयार झाले.

दरम्यान, केंद्र सरकारने टिक टॉकवर बंदी घातली. त्यानंतर, ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली. इन्स्टाग्रामवर तिचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने ‘दुर्गा ग्रुप’ नावाने संस्था सुरु केली असून याच्या माध्यमातून ती कपड्यांचा व्यवसाय करत होती. मयुरी अचानक बेपत्ता होण्यामागचे करण अद्याप समजू शकले नाही. परंतु तिच्या बेपत्ता होण्यामुळे आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मयुरी 15 जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास घरात कोणी नसताना कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ती अद्याप घरी परत आलेली नाही. याप्रकरणी मंगल दिलीप पवार (वय-40) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.