IMPIMP

सकाळी संचारबंदीची घोषणा, रात्री नियमांचे उल्लंघन ! पुण्यात शाही विवाह सोहळ्यात सर्व पक्षीय दिग्गजांनी उडविला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

by sikandershaikh
Wedding-ceremony

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) dhananjay mahadik | कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी सकाळी बैठका घेऊन रात्रीच्या संचारबंदींची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी शिस्तपालनांसाठी आठवड्याची मुदत दिली. नाही तर पुन्हा लॉकडाऊन करुन असा इशारा दिला. त्याचवेळी पुण्यात एका शाही विवाह सोहळ्यात सर्व पक्षांच्या नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंग, विवाहातील निर्बंधाचा फज्जा उडविला.

या बैठकीला सर्व पक्षांचे आमदार, खासदार उपस्थित होते. त्यातील अनेकांनी रात्रीच्या या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यामुळे हे नियम केवळ सामान्यांसाठीच आहेत का अशी विचारणा सोशल मिडियामधून सुरु झाली आहे.भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांचा मुलगा पृथ्वीराज याचा शाही विवाह रविवारी पुण्यात पार पडला. या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. अनेकांनी मास्कचाही वापर केलेला दिसून येत नव्हता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या शाही सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, संजय राऊत, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित होते. शासनाकडून विवाहाला केवळ २०० जणांना परवानगी दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या शाही सोहळ्यात एकाच वेळी किमान ८०० जण उपस्थित असल्याचे दिसून आले. या वेळी शेकडो पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तरीही कोणीही कोविड नियमांचे पालन होत नसल्याचा आक्षेप घेतला नाही. मागेही भाजपच्या आमदारांचा शाही सोहळा पुण्यात झाला होता. त्यावेळीही अशीच राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी ही पोलिसांनी डोळ्यावर कातडी ओढून घेतली असल्याचे दिसून आले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी दुपारी नाशिकमधील राष्ट्रवादी आमदाराच्या शाही विवाहातील गर्दीवरुन सरकारवर टीका केली होती.
त्यानंतर पुण्यातच रात्री भाजपच्या माजी खासदाराच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात प्रवीण दरेकरसह अनेक नेते सहभागी झालेले दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातच होते.
शरद पवार यांनी या शाही विवाहाला उपस्थिती लावली तरी, अजित पवार यांनी येथे येणे टाळले.
आपणच संचारबंदीची घोषणा करायची आणि त्यानंतर अशा विवाहांना गेल्यास टिका होणार हे गृहीत धरुन त्यांनी येणे टाळल्याचे सांगितले जाते.

या शाही विवाह सोहळ्यात कोवीड नियमांची पायमल्ली झाल्याबद्दल पोलीस काय कारवाई करतात की ही
नियमावली केवळ सामान्यांसाठी आहे, राजकीय नेत्यांना त्यात अपवाद केले आहे,
हे दर्शवून मागील वेळीप्रमाणे यावेळीही चुप्पी साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts