IMPIMP

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

by omkar

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – वय ८३, ७० आणि ६५ वर्षाच्या तिघा ज्येष्ठांवर कोणाचा संशयही येणार नाही. पण ते तिघे चक्क गांजाची (weed) तस्करी करीत असल्याचे आढळून आले.
त्यांच्या ताब्यातून १ लाख ३० हजार ५५ रुपये किंमतीचा ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी भोसरी एमआयडीची पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसानी माणकाबाई शहाजी वाघमारे (वय ६५, रा. आंबेडकर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), मामू ऊर्फ रऊफ खान रमजान खान (वय ८३, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) आणि सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय ७०, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी दुपारी लांडेवाडीतील आंबेडकरनगर झोपडपट्टी, विठ्ठलनगर झोपडपट्टी, बालाजीनगर झोपडपट्टी या ठिकाणी छापा घालून या तिघांकडून ४ किलो ६०३ ग्रॅम गांजा(weed) हस्तगत केला आहे. या ज्येष्ठांवर कोणाचा संशय येणार नाही, याचा गैरफायदा घेऊन ते गांजाची विक्री करीत होते.
सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

Also Read:- 

Pune Crime News : लग्नापुर्वीचं ‘झेंगाट’ सुरूच, नवरा बनला होता अडसर ! 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दुधातून झोपेच्या गोळया देऊन मारलं, पुण्यातील खळबळजनक घटना(affair)

पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग

कोलकातामध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

विहिंपनं व्यक्त केला संताप, म्हणाले – ‘ट्विटर ईस्ट इंडिया कंपनी सारखं वागायला लागलंय, इथूनच पैसा कमावायचा अन् …’

पुण्यात शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत

Ajit Pawar : ‘…तो पर्यंत कोणी मायेचा लाल महाविकास सरकार पाडू शकणार नाही’

Pravin Darekar : ‘… तर सरकार कधी कोसळेल हे देखील त्यांना कळणार नाही’

Related Posts