IMPIMP

Pune Crime | तुझी ‘गारवा हॉटेलमालका’सारखी गत होईल; जमिनीच्या वादातून धमकी देणार्‍या 5 जणांवर FIR दाखल

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून ऊरुळी कांचन (uruli kanchan) येथील गारवा हॉटेलचे (Hotel Garva) मालक रामदास आखाडे (Ramdas Akhade) यांचा सुपारी देऊन खुन केला गेला होता. जमिनीच्या वादातून एका महिलेला अशा प्रकारे तुझी गारवा हॉटेलच्या मालकासारखी गत होईल, अशी धमकी देण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार ऊरुळी कांचनमध्ये घडला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) महेश बगाडे, सारिका बगाडे, ओंकार बगाडे, अविष्कार बगाडे, केशव बगाडे (सर्व रा. ऊरुळी कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आराधना कैलास कांचन (वय ४९, रा. बगाडे मळा, दत्तवाडी, ऊरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची जमीन आहे. त्या ठिकाणी प्लॉटला तार कंपाऊंट करण्यासाठी त्यांनी ३१ जुलै रोजी कामगारांना बोलावले होते. आरोपींना या कामगारांना हुसकावून लावले. त्याचा फिर्यादी व त्यांचे पती यांनी जाब विचारला असताना आरोपींनी बेकायदा जमाव जमविला. सारिका बगाडे हिने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन कसल्या तरी हत्याराने त्यांच्या मनगटावर मारुन जखमी केले. फिर्यादी यांच्या पतीस शिवीगाळ करुन ‘ही जागा माझ्या भावाची आहे. तुला भरपूर जागा आहे. तू ही जागा घेऊ नको. नाही तर तुझी गारवा हॉटेलच्या मालकासारखी गत होईल,’’ अशी धमकी दिली़ व पोलिसांकडे तक्रार केली तर मर्डर करुन टाकील, अशी धमकी दिली. सहायक फौजदार दिवेकर तपास करीत आहेत.

Web Title : Your past will be like that of a ‘Garva hotel owner’; FIR filed against 5 persons for threatening in land dispute

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या 10.30 टक्क्यांवरून वाढवून 33 % करण्याचे निर्देश

Pune Crime | कोंढव्यात युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खुन; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Pune Crime | बायकोच्या ‘मारा’ला घाबरुन पळणार्‍या नवर्‍याची लोकांकडून ‘चोर’ समजून ‘धुलाई’ !

Related Posts