IMPIMP

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

by nagesh
FB Account Cloning | ratnagiri collector facebook account hacked demand for money from hackers

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन FB Account Cloning | सध्या फेसबुक अकाऊंटचे क्लोनिंग (FB Account Cloning) करून मित्रयादीतील लोकांकडे पैसे मागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याचा फटका आता रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांनाही (Ratnagiri Collector) बसला आहे. एका हॅकरने चक्क रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले. आता या अकाऊंटवरून पैशांची मागणी होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील (Ratnagiri Collector Dr. B.N. Patil) यांनी लोकांना आवाहन केले आहे की, पैशांची मागणी करणारे मॅसेज ज्यांना येतील त्यांनी जवळच्या पोलीस स्थानकात संपर्क साधावा. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शनिवारी रात्री उशिरा माहिती देण्यात आली.

याबाबत माहिती देण्यात आली की, रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या सरकारी अधिकृत Collectorate Ratnagiri या फेसबुक अकाउंटचे बनावट खाते तयार करून संबंधित व्यक्ती जनतेकडे पैशाची मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा.

अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाउंट तयार केले आहे.
ही व्यक्ती आता रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, आधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत आहे.
रुग्णालयात असल्याने पैशाची आवश्यकता आहे.
अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती (FB Account Cloning) पाठवत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : FB Account Cloning | ratnagiri collector facebook account hacked demand for money from hackers

हे देखील वाचा :

Crime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात इंद्रायणी नदीत 2 जण बुडाले

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम ! 10,000 रुपयांनी ‘स्वस्त’ मिळतंय एक तोळा, जाणून घ्या नवीन दर

mParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना ‘DL’ आणि ‘RC’ सोबत ठेवण्याची गरज नाही; ‘DigiLocker’ सुद्धा असेल मान्य

Related Posts