IMPIMP

संभाजी भिडेंना मोठा धक्का; शिवप्रतिष्ठानमध्ये फूट

by sikandershaikh
sambhaji-bhide

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (sambhaji bhide) यांच्या श्री शिवप्रतिष्ठानमध्ये मोठी फूट निर्माण झाली आहे. श्री शिवप्रतिष्ठानमधील निलंबित करण्यात आलेले कार्यवाह नितीन चौगुले यांनी मेळावा घेत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या संघटनेची घोषणा केली. त्यांच्या नव्या संघटनेमुळे संभाजी भिडे यांना मोठा धक्का बसला आहे.

नितीन चौगुले यांनी या नव्या संघटनेची स्थापना करताना सांगितले, की राजकारणविरहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच या संघटनेकडून राज्यभर काम केले जाणार आहे. संभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार, गेल्या 20 वर्षांपासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत आहे. पण संघटनेतील काही लोकांना माझे काम सहन झाले नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप सुरु केले आहेत. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी नितीन चौगुले यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर नितीन चौगुले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्यानुसार, याच मेळाव्यात चौगुले यांनी नव्या संघटनेची घोषणा केली.

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम

संभाजीराव भिडे (sambhaji bhide) यांनी दिलेल्या आदेशानुसार, संघटनेमध्ये गेल्या 20 वर्षांपासून काम करत होतो.
हे काम करताना कोणतीही अपेक्षा केली नाही आणि त्यांनी दिलेले काम करत आलो.
या कालावधीत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम वाढवले.
मात्र, संघटनेतील काही लोकांना हे सहन झाले नाही.
त्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप सुरु केले आणि माझी बदनामी सुरु केली. त्यामध्ये त्यानी शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केले, असेही चौगुले म्हणाले.

Pune News : मनपात भाजपाची एकहाती सत्ता; तरीही कामे रखडल्याची खासदार बापटांकडून अजित पवारांकडे तक्रार

Related Posts