IMPIMP

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

by nagesh
Sangli District Bank Election | minister Vishwajeet Kadam relative and congress mla vikram sawant losse sangli dcc bank election

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli District Bank Election | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे (Sangli District Bank Election) निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच फेरीत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. जतमधून काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत (MLA Vikram Sawant) पराभूत झाले आहेत. भाजपच्या (BJP) पँनेलमधील प्रकाश जमदाडे (Prakash Jamdade) यांनी त्यांचा पराभव केला आहे. आमदार सावंत हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे मावसभाऊ आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sangli District Bank Election) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. १२ टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया होत असून यासाठी ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी १ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधीस परवानगी आहे. पहिल्या फेरीत जतमधून आमदार सावंत यांचा पराभव झाला आहे तर आटपाडीमधून शिवसेनेचे तानाजी पाटील (Tanaji Patil) विजयी झाले आहेत. पाटील यांनी माजी आमदार राजेंद्र अण्णा यांचा पराभव केला आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या (Sangli District Bank Election) तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, वाळवा या सोसायटी गटातील जागा महाआघाडीकडे असून त्याठिकाणी अनुक्रमे बी. एस. पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) , आ. मोहन कदम (MLA Mohan Kadam), विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील विजयी. सोसायटी गटामध्ये एकूण १० जागा असून त्यामध्ये राष्ट्रवादी ३,शिवसेना ३, काँग्रेस ३, भाजपची १ जागा आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एकूण ८५.३१ टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी २१ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून १८ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. यंदा चुरशीने ८५.३१ टक्के मतदान झाले असून अनेक मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी गटासह पतसंस्था, ओबीसी या गटांमध्येही चुरस दिसून आली. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होत असल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र म्हणून जिल्हा बँकेची (Sangli District Bank Election) ओळख आहे.
बँकेवर प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची सत्ता आहे.
यंदा महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली आहे.दोन्ही पॅनेलमध्ये दिग्गज नेते होते.
मतदानावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार, पक्षांचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यात ठाण मांडून होते.
एकूणच हि निवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Sangli District Bank Election | minister Vishwajeet Kadam relative and congress mla vikram sawant losse sangli dcc bank election

हे देखील वाचा :

Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

Indian Air Force Recruitment 2021 | 10 वी ते पदवीपर्यंतच्या मोठी संधी ! भारतीय वायुदलात ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या

Related Posts