IMPIMP

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

by nagesh
Satara Co-operative Bank Election | satara bank election 2021 role of ncp against mp udayanraje bhosale is important

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी विकेंड लॉकडाऊनला विरोध दर्शवत भीक मांगो आंदोलन केले होते. त्यातून त्यांच्याकडे 450 रुपये जमा झाले होते. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन दिली होती. मात्र, कायदेशीररित्या ही रक्कम स्वीकारता येत नसल्याचे पत्र देत जिल्हा प्रशासनाच्या वतीने खासदार उदयनराजे यांनी दिलेले पैसे त्यांना परत देण्यात आले आहेत.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

विकेंड लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला खासदार उदयनराजे udayanraje bhosale यांनी विरोध केला होता. त्यानुसार, त्यांनी 10 एप्रिल रोजी साताऱ्यामध्ये भीक मांगो आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान साडेचारशे रुपये जमा झाले होते. त्यानंतर उदयनराजे यांनी ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाकडे दिली होती. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांनी एका ओळीचे पत्र लिहित ही रक्कम कायदेशीररित्या स्वीकारता येत नाही, असे म्हटले आहे. तसेच हे पैसे एका पाकिटात घालून त्यासोबत ते पत्र जोडून उदयनराजेंच्या जलमंदिर येथील कार्यालयात जमा केली. तसेच कार्यालयाची पोचही घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहे. यापूर्वी राज्यभरात विकेंड लागू करण्यात आला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात खासदार भोसले udayanraje bhosale यांनी भीक मांगो आंदोलन केले होते. त्यातूनच त्यांच्याकडे साडेचारशे रुपयांची रक्कम जमा झाली होती.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

Related Posts