IMPIMP

Satara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

by nagesh
Satara Co-operative Bank Election | satara bank election 2021 role of ncp against mp udayanraje bhosale is important

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Satara Co-operative Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या (Satara Co-operative Bank Election) रिंगणात आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे उतरले आहेत. यामुळे यंदा गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था आदी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विशेष म्हणजे उदयनराजे यांच्याविरोधात अजुन तरी कोणीही इच्छुक दिसुन आलं नाही. त्यामुळे यंदा उदयनराजे भोसले यांना या मतदारसंघातुन बिनविरोध निवडीची संधी निर्माण झालीय. मात्र, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे उदयनराजे विरोधात दुसरा उमेदवार देणार का? हे बघावं लागणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था हा मतदारसंघ एक चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघातून अधिक वेळा अशोक पाटील-शिरगावकर हे निवडुन आले आहेत. तर या मतदार संघात एकूण 272 ठराव आहे. अधिक ठराव हा सातारा आणि कराड तालुक्यात आहेत. या मतदारसंघात अनेक नेत्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. यात रघुनाथराव पाटील, शंकरराव संसुद्दी, हणमंतराव साळुंखे, जयवंतराव चव्हाण, अशोकराव पाटील-शिरगावकर यांचा समावेश आहे. त्यांच्यानंतर अलीकडच्या काळात खा. उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) हे या मतदारसंघातून निवडून आले आहे. तसेच 2 पंचवार्षिक निवडणुकीत उदयनराजेच संचालक झाले आहेत.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा त्यावेळी उदयनराजेंनी पराभव केला होता. दरम्यान, यंदाही सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या रिॆगणात उदयनराजे उतरणार आहेत. मात्र, या वेळेची निवडणूक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. दरम्यान, मागील निवडणुकीमध्ये पराभव पहाता पालकमंत्री पाटील हे उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यामुळे आता काय रणनीती आखली जाते हे पाहणे गरजेचे आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Satara Co-operative Bank Election | satara bank election 2021 role of ncp against mp udayanraje bhosale is important

हे देखील वाचा :

Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ

Javed Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…

Defective Number Plate Fine | अलर्ट ! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर भरावा लागेल मोठा दंड, जाणून घ्या

Related Posts