IMPIMP

Satara Crime | पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट ‘CEO’ च्या दालनात ‘राडा’

by nagesh
Satara Crime | 'CEO of Zilla Parishad satara suspended one, his wife came into office

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन –  Satara Crime | एका औषध निर्माण अधिकाऱ्याला (Pharmaceutical Officer) निलंबित केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीने (Satara Crime) जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या दालनात गदारोळ माजवला आहे. आपल्या पतीला निलंबित केल्याने पत्नीने थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच राडा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित (Suspended) करण्यात आलं. मात्र पत्नीच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेत तणाव निर्माण झाला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संबधित औषध निर्माण अधिकारी हा कोरेगाव तालुक्यातील (Koregaon taluka) एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता.
कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे (Department of Health) आल्या होत्या.
यावरुन आरोग्य विभागाकडून औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
मात्र, या निलंबनाचाच जाब विचारण्यासाठी अधिका-याच्या पत्नीने थेट जिल्हा परिषद गाठलं आहे.
त्यावेळी त्या महिलेनं सीईओं विनय गौडा (CEO Vinay Gowda) यांच्या दालनात गोंधळ घातला आहे.

सीईओंच्या दालनातच त्या महिलेनं अनेक प्रश्न केले आहेत. दरम्यान दंगा करतेवेळी त्या महिलेस शांत राहण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
पंरतु, ती महिला शांत रहाण्यााच्या स्थितीमध्ये नव्हती.
त्यांनतर तेथील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना (Police) याबाबत माहिती दिली. नंतर तातडीने महिला पोलिसांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली.
दरम्यान, सीईओं विनय गौडा यांनी त्या महिलेला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेवून तुमची तक्रार देण्यास सांगितले. तरीही महिलेनं ऐकलं नाही.
नंतर कर्मचाऱ्यांनी महिलेची समजूत काढत आरोग्य विभागात जाण्याचा सल्ला दिला. नंतर महिला आरोग्य विभागात गेली.

Web Title : Satara Crime | ‘CEO of Zilla Parishad satara suspended one, his wife came into office

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | विकेंडपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ 4 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट

Pune Crime | चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; वारजे माळवाडीच्या रामनगर येथील घटना

Mumbai Crime | मुंबईतील जोगेश्वरीमधून एक दहशतवादी अटकेत

Pune Police Combing Operation | गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 13 कोयते, 2 तलवार जप्त

Related Posts