IMPIMP

Satara Crime | दुर्दैवी ! बोलेरोची दुचाकीला समोरून धडक, बापलेकाचा मृत्यू

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइनSatara Crime | सातारा जिल्ह्यातील म्हसवड-मायणी रस्त्यावर (Mhaswad-Mayani Road) ढाकणी फाटा येथे बोलेरोने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत (Bolero Hits Bike) नरबटवाडी (ढाकणी) येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नरबट Social worker Popatrao Narbat (वय 52) व त्यांचा मुलगा विश्वास नरबट Vishwas Narbat (वय 13) यांचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात (Satara Crime) मंगळवारी सायंकाळी झाला असून अपघातप्रकरणी म्हसवड पोलिसांनी (Mhaswad Police) अज्ञात चालकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी विश्वासला वह्या आणण्यासाठी त्याला घेऊन दुचाकीवरून पोपट नरबट म्हसवडकडून मायणीच्या दिशेने निघाले होते. ढाकणी फाटा येथे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभी होती. तिला ओव्हरटेक (Overtake) करत असताना समोरून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हि धडक इतकी जोरात होती की, विश्वासचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोपट नरबट यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा वाटेतचं मृत्यू झाला. दरम्यान, बोलेरो गाडी चालक गाडीसह पसार झाला असून रस्त्यात निष्काळजीपणे ट्रॉली उभी करणाऱ्या आणि अज्ञात बोलेरो चालकावर म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Satara Crime)

दरम्यान, पोपट नरबट हे सामाजिक कार्यकर्ते असून नरबटवाडी येथे अद्यावत वाचनालय उभे करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्याचबरोबर तालुक्यात प्राथमिक शाळा आदर्शवत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांची पत्नी आशा वर्कर (Asha Worker) म्हणून शासकिय आरोग्य विभागात काम करते. कोरोना काळात नरबट दाम्पत्यांनी फ्रंटलाईन वर्कर (Frontline worker) म्हणून काम केले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्वत: जीव जातानाही मुलासाठी टाहो!
बोलेरोने नरबट यांच्या दुचाकीला इतक्या जोरात धडक दिली होती की, विश्वास निपचित पडला होता.
हि बाब पोपट नरबट यांच्या लक्षात येताच अरे कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा, असा टाहो ते फोडत होते.
त्याचवेळी ढाकणी येथील धीरज सरतापे यांनी प्राथमिक मदत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला नाही.
दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title :- Satara Crime | father and son died in bolero blow at dhakni terrible accident while overtaking a trolley

हे देखील वाचा :

Anil Deshmukh-Anil Parab | ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी अनिल देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?’

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

Related Posts