IMPIMP

Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळयाबाबत शालिनीताईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘थोरल्यासह धाकटया पवारांचा हात’

by nagesh
Shikhar Bank Scam Case | shalinitai patil criticizes sharad pawar and ajit pawar in shikhar bank scam case

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची (jarandeshwar sahakari sakhar karkhana) वार्षिक सभा कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनी पाटील (Dr. Shalini Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचा नामोल्लेख टाळत शिखर बँकेच्या गैरव्यवहारात (Shikhar Bank Scam Case) थोरल्या आणि धाकट्या पवारांचा हात आहे. शिखर बँकेच्या गैरव्यवहाराची (Shikhar Bank Scam Case) पुन्हा चौकशी सुरु झाली तर राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

कारखान्याच्या वार्षिक सभेस या वेळी उपाध्यक्ष शंकरराव पाटील, श्रीरंग सापते, पोपटराव जगदाळे, शहाजी भोईटे, दत्तूभाऊ धुमाळ, अक्षय बर्गे, संतोष कदम, शंकर मदने, राहुल चव्हाण आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते.

डॉ. शालिनी पाटील म्हणाल्या, सभासद शेतकऱ्यांकडून जरंडेश्वर कारखाना काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत.
सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने (ED) जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला आहे.
सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) आपल्याला नक्कीच सहकार्य करतील.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पेन्शनमधून औषधांचा खर्च

वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे.
तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर (Pension) जरंडेश्वरची लढाई लढत आहे,
असे म्हणत त्या वसंतरावदादा (Vasantravadada) यांच्या आठवणींनी गहिवरल्या.
काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत,
असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक किसनराव घाडगे यांनी नऊ ठराव वाचून दाखवले.
यामध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने योग्य तो निर्णय घ्यावा असा ठरावही होता.
या सर्व ठरावांना सभेने मंजुरी दिली.

Web Title :-  Shikhar Bank Scam Case | shalinitai patil criticizes sharad pawar and ajit pawar in shikhar bank scam case

हे देखील वाचा :

Actress MMS leaked | भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा MMS व्हिडिओ झाला लीक, अभिनेत्री म्हणाली – ’माझा प्रायव्हेट व्हिडिओ वायरल केला, तुमची बहिण…’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 258 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही मागणी केल्यानं आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?

Related Posts