Ratnagiri News : नोकरीचे आमिष दाखवून 113 जणांची 36 लाखांची फसवणूक; संचालकाला अटक

रत्नागिरी : Ratnagiri News | खेडी येथील श्री स्वामी समर्थ कृपा एंटरप्रायझेस या मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून नोकरी आणि कमिशनचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या संचालकाला पोलिसांनी अटक केली. त्याला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संचालकाने 113 जणांची तब्बल 36 लाखांची फसवणूक केली आहे.
संजय रामभाऊ चव्हाण असे त्या संचालकाचे नाव आहे. मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून त्याने 23 जणांची तब्बल 23 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. त्याने मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून अनेकांना नोकरी आणि कमिशनचे आमिष दाखवले होते. त्यामुळे याच कमिशन आणि नोकरीमुळे त्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी कैलास मालुसरे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर फसवणूक झालेले अनेकजण पुढे आले आहेत. आत्तापर्यंत 113 जणांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या. सध्या ही रक्कम 36 लाख 84 हजार रुपयांवर गेली आहे.
दरम्यान, संजय चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. त्यानुसार, चव्हाण हा चिपळूण रेल्वे स्टेशनजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. याच माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चंद्रपूर : पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीनंतर मुलगा झाला बेपत्ता; शोधकार्य सुरु
- ‘कंबरदुखी’पासून खुप परेशान आहात ? ‘या’ टीप्स फॉलो केल्या तर मिळेल आराम
- Video : सपना चौधरीच्या गाण्यावरील ‘या’ अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
- Pulwama Attack 2019 : ‘हल्ल्याबद्दलच्या गुप्त माहितीकडे PM मोदींनी दुर्लक्ष का केलं ?, राहुल गांधींचा प्रश्न
- वासिम जाफरने ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा झाला होता आरोप
- Business Idea : स्टॅम्प पेपरच्या व्यवसायातून भरपूर पैसा कमावण्याची संधी ! कमी पैशात मिळेल जास्त नफा, जाणून घ्या
- उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करावा समावेश, ‘हाय ब्लड प्रेशर’ येईल कंट्रोलमध्ये, जाणून घ्या
Comments are closed.