IMPIMP

Solapur Crime | एसटी चालकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Solapur Crime | st-strike the father went to the st movement and thechild strangled his mother with his sari

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Solapur Crime | काेंडी (ता. सोलापूर) येथे एसटी चालकाच्या (ST Driver) मुलाने राहत्या घरात गळफास
घेऊन आत्महत्या (Suicide) केली. बुधवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार (Solapur Crime) घडला. अमर तुकाराम माळी (Amar Tukaram Mali) (वय, 20) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून याबाबतची नोंद सिव्हील पोलीस चौकीत (Civil Police Chowki Solapur) झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमर माळी (Amar Mali) याचे दयानंद महाविद्यालयात 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. काही दिवसांपासून तो शांत शांत रहात होता. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी (Tukaram Mali) यांच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून एसटीचा संप (ST Workers Strike) सुरु असून पगार नाही. पैसे कुठून देणार असे वडीलांनी अमरला सांगितले. त्यानंतर ते तेथून आंदोलनस्थळी निघून गेले. तर अमरही बाहेर गेला. त्यानंतर दुपारच्या सुमारास अमर घरी परत आला असता त्याची आई आणि व त्याची चुलती जेवण करत होते. त्याला जेवणासाठी बोलावले मात्र, त्याने नकार देत रुममध्ये जाऊन विश्रांती घेतो असे सांगितले. (Solapur Crime)

थोड्यावेळानंतर आईने पुन्हा त्याला जेवणासाठी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने त्यांनी रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
पण आतून कडी असल्याने तो उघडला गेला नाही. मोठ्या भावानेही आवाज दिला.पण तरीही आतून काही आवाज येत नसल्याने खिडकीतून पाहिले असता अमरने साडीच्या साहाय्याने गळफास (Suicide) घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

दरवाजा तोडून भावाने रुममध्ये आत प्रवेश केला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Died) झाला.
दरम्यान, आंदोलनामध्ये सहभागी झालेले तुकाराम माळी यांना घरी बोलावण्यात आले.
ही घटना समजताच वडीलांच्या डोळ्यातील अश्रुचा बांध फुटला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Solapur Crime | st-strike the father went to the st movement and thechild strangled his mother with his sari

हे देखील वाचा :

Shaheer Shaikh’s Father Death | शाहीर शेखच्या वडिलांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

The Great Indian Murder | ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ : अजय देवगण निर्मित वेब सिरीजच्या ट्रेलरचे जोरदार स्वागत, अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

Related Posts