IMPIMP

सुनील गावस्कर यांच्यानंतर ‘हा’ कसोटीतील भारताचा सर्वोत्तम सलामीवीर

by bali123
gavaskar i havent seen better indian test opening batsman him sourav ganguly hails virender

सरकारसत्ता ऑनलाइन : वीरेंद्र सेहवाग Virender Sehwag हा टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर म्हणून ओळखला जातो. BCCI चा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला वीरेंद्र सेहवागसारखा स्फोटक सलामीवीर मिळवून दिला. अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली १९९९ मध्ये वीरेंद्र सेहवाग Virender Sehwag याने पाकिस्तानविरुद्ध वन डे संघातून पदार्पण केलं. पण सेहवागला खरं यश गांगुलीच्या नेतृत्वाखाली मिळाले. वीरेंद्र सेहवाग Virender Sehwag हा कसोटीमध्ये ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. सेहवागला २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा सलामीला पाठवण्यात आले. आणि त्याने या संधीचा फायदा घेऊन इतिहास घडवला.

गांगुली भारताचा कर्णधार असताना त्याने सेहवागला सलामीला खेळण्याची संधी दिली. सुरुवातीला सेहवागने याला नकार दिला. तेव्हा सेहवाग गांगुलीला म्हणाला, मी मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि यापूर्वी कधी सलामीला आलेलो नाही. पण गांगुलीने त्याची समजूत काढली आणि त्याला सलामीला खेळायला पाठवले. गांगुलीने २०००च्या दशकामध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळले होते.

सौरभ गांगुली यांनी एका मुलाखतीत सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार सलामीवीर म्हणजे वीरेंद्र सेहवाग असे मत व्यक्त केले होते. अशा शब्दांत सेहवागचे कौतुक केले आहे. ते पुढे म्हणाले, ”सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटीत सर्वोत्तम सलामीवीर म्हणून वीरूनं स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांचे सलामीवीर म्हणून अमुल्य योगदान आहे. त्यांच्यानंतर सेहवागनं सलामीला खेळताना अनेकदा मॅच विनिंग खेळी केली.” सेहवागने आपल्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामन्यांत ४९.३४ च्या सरासरीनं ८५८६ धावा केल्या आहेत, तर ३१९ ही त्याची कसोटीमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत २३ शतकं व ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषण

Related Posts