IMPIMP

IND vs ENG : ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने कालचा सामना जिंकला

by bali123
Virat Kohli Leave Captaincy | virat kohli step down from capatancy indian cricket team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताने या दौऱ्यामध्ये टेस्ट आणि टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. तसेच काल झालेल्या वनडे सीरिजमधील india vs england पहिल्या सामन्यात दणक्यात सुरुवात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट गमावून ३१७ धावा केल्या होत्या. यामध्ये शिखर धवन , विराट कोहली, के.एल. राहुल आणि कृणाल पांड्या यांच्या अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडलाचा डाव २५१ धावांमध्येच संपुष्टात आला. यामध्ये इंटरनॅशनल डेब्यू करत असलेला फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने चार आणि शार्दुल ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या आहेत. आज आपण टीम इंडियाच्या विजयाची ५ कारणे जाणून घेणार आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

१. टीम इंडियाने डावाची सुरुवात अत्यंत संथपणे केली होती. इंडियाने तर पहिल्या १० ओव्हरमध्ये फक्त ३९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा लवकर बाद झाला तरी शिखर धवन एका बाजूने किल्ला लढवत होता त्याला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने उत्तम साथ दिली. या दोघांच्या भागीदारीने टीम इंडियाला २०० धावांचा टप्पा पार करता आला.

२. जेव्हा ४० ओव्हर पूर्ण झाले तेव्हा टीम इंडियाचा स्कोर ४ बाद २०५ एवढा होता. त्यानंतर हार्दिक पांड्या अवघी १ रन करून बाद झाला. मात्र त्यानंतर के. एल राहुल आणि पहिला वनडे सामना खेळणारा कृणाल पांड्याने अर्धशतकासह टीम इंडियाचा स्कोर ३१७ धावांवर नेला. शेवटच्या ५ ओव्हरमध्ये टीम इंडियाने ६७ धावा केल्या होत्या.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

३. धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडने अगदी वेगाने सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या फास्ट बॉलरनी जोरदार पुनरागमन करत ३० ओव्हरपर्यंत त्यांच्या निम्मा संघ माघारी धाडला होता. विशेष म्हणजे या सामन्यात १० पैकी ९ विकेट्स या फास्ट बॉलरनी घेतल्या आहेत.

४. इंटरनॅशनल डेब्यू करणारा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात ४ विकेट घेऊन टीम इंडियाच्या यशात महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच याच सामन्यात पहिला वनडे सामना खेळणारा कृणाल पांड्याने अर्धशतक केले आणि बॉलिंग करत एक विकेट सुद्धा घेतली आहे.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

५. वनडे क्रिकेट सामन्यात मिडल ओव्हर खूप महत्वाच्या असतात. टीम इंडियाने पहिल्या १० ओव्हरमध्ये ३९ रन्स केले तर इंग्लडने पहिल्या १० ओव्हरमध्ये ८९ रन्स केले होते. म्हणजे टीम इंग्लंडने पहिल्या १० ओव्हरमध्ये भारतापेक्षा ५० रन्स जास्त करूसुद्धा त्यांचा पराभव झाला. कारण त्याचे बॅट्समन मधल्या ओव्हरमध्ये चांगली खेळी करु शकले नाहीत. तर इंडियाच्या बॉलरनी जोरदार कमबॅक करत मधल्या ओव्हरमध्येच इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला होता.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts