IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Punit Balan Group's winning streak; First win for Braveheart Cricket Academy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत विजयाचा चौकार नोंदविला. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने स्पर्धेत पहिला विजय नोंदविला आणि गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धनराज शिंदे ७५ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने इव्हॅनो इलेव्हन संघाचा १६ धावांनी पराभव केला. ४०० हून अधिक धावा निघालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २० षटकात २३१ धावांची विशाल धावसंख्या उभी केली. धनराज शिंदे याने ३४ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. यश खळदकर याने ५८ धावांची तर, ओकांर खाटपे याने २८ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना इव्हॅनो इलेव्हनचा डाव २०५ धावांवर मर्यादित राहीला. तुषार सिन्हा (नाबाद ८३ धावा) आणि शुभम जाधव (नाबाद ६७ धावा) यांनी इव्हॅनो संघाकडून जोरदार प्रतिकार केला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

Balan-Group-2-2.webp (696×399)

जय सी. याच्या ८२ धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा ११५ धावांनी सहज पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २२८ धावांचा डोंगर उभा केला. जय याने ३० चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. वैभव लव्हांडे (६५ धावा) आणि चित्तरंजन रे (३६ धावा) यांनीही दुसर्‍या बाजूने साथ दिली. या आव्हानासमोर क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा डाव ११३ धावांवर मर्यादित राहीला.

Balan-Group-1.webp (696×399)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद २२८ धावा (जय ८२ (३०, १० चौकार, ५ षटकार),
वैभव लव्हांडे ६५ (३३, १० चौकार, २ षटकार), चित्तरंजन रे ३६, रोहीत शिंदे ३-३८, रवि चौहान २-३६) वि.वि.
क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्सः २० षटकात ८ गडी बाद ११३ धावा (पार्थ पवार ३०, यश गुजर २३,
विजयकुमार मामिदशेट्टी २-१३); सामनावीरः जय सी.;

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुनित बालन ग्रुपः २० षटकात ६ गडी बाद २३१ धावा (धनराज शिंदे नाबाद ७५ (३४, ९ चौकार, ४ षटकार),
यश खळदकर ५८ (३५, ८ चौकार, १ षटकार), ओकांर खाटपे २८, ऋषीकेश जाधव ४-३३)
वि.वि. इव्हॅनो इलेव्हनः २० षटकात २ गडी बाद २०५ धावा (तुषार सिन्हा नाबाद ८३ (३६, ५ चौकार, ८ षटकार),
शुभम जाधव नाबाद ६७ (५७, ७ चौकार, १ षटकार), निळील जोशी ३७, पुनित बालन १-५१); सामनावीरः धनराज शिंदे;

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Punit Balan Group’s winning streak; First win for Braveheart Cricket Academy

हे देखील वाचा :

Shruti Haasan | आजारपणातील फोटो शेअर करत अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली – ‘हा लुक देखील… ‘

Pune Crime | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

BJP Leader Chandrashekhar Bawankule | राज्यपालांच्या बदलीबद्दल भाजपकडे एकच प्रतिक्रिया? चंद्रकांत बावनकुळेंनी दिले देवेंद्र फडणवीसांसारखे उत्तर

Related Posts