IMPIMP

‘या’ 6 शहरांमध्ये होणार सामने ! ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्यांसाठी Bad News

by sikandershaikh
ipl 2021 matches to be played in these 6 cities bad news for mumbai indians fans

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बीसीसीआय (BCCI) नं यंदाच्या आयपीएल (Indian Premier League – IPL) साठी 6 शहरांची निवड केली आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे आयपीएल सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. मुंबईत मात्र प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय आयपीएल सामन्यांचं आयोजन होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) हे 3 संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत.

जी 6 शहरं सामन्यांसाठी नेमली आहे त्यापैकी अहमदाबाद हे एकमेव असं शहर आहे की, ज्यांचा कोणताही फ्रँचायजी संघ नाही. उर्वरीत 5 शहरं फ्रँचायजी संघ आहेत जी त्यांच्या मैदानावर सामने खेळण्यास सक्षम असतील. यावेळी आयपीएलचे सामने 8 ऐवजी 6 शहरात होऊ शकतात. दिल्लीला यजमान शहरांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. हैदराबादला स्थानिक क्रिकेटमुळं होस्टींग शहरात स्थान देण्यात आलेलं नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

वानखेडे स्टेडियमवर सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारनं परवागनी दिली आहे, परंतु प्रेक्षकांना परवानगी दिलेली नाही. आयपीएलची 11 एप्रिलपासून सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

बीसीसीआयनं निर्णय घेतला आहे की, काही राज्यात सामन्यादरम्यान प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार
नाही, तर काही राज्यात स्टेडियमच्या क्षमतेनुसार 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार आहे.
परंतु आयपीएल (ipl 2021 matches) फ्रँचायजींनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत एका फ्रँचायजी
अधिकाऱ्यानं सांगितलं की, 1-2 राज्यात हे आयोजन करणं योग्य झालं असतं.
2020 चा हंगाम 3 ठिकाणी झाला आणि तो योग्य होता. 8 संघांना गटात विभागलं जावं असा प्रस्ताव बीसीसीआयनं ठेवला आहे.

राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्सचा संघ 6 शहारत होणाऱ्या या स्पर्धेच्या बाजूनं
नाही अशा बातम्या माध्यमातून समोर येताना दिसत आहेत.
क्रिकबजच्या अहवालानुसार, एका अधिकाऱ्यानं सांगिलतं की, आम्हाला होम ग्राऊंडमध्ये सर्वाधिक सपोर्ट मिळतो.
अशा स्थितीत जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळत नाही तेव्हा प्ले ऑफसाठी पात्र ठरणं कठीण होईल.

…म्हणून 60 पेक्षा कमी वय असताना देखील सुप्रिया सुळेंना देण्यात आली ‘कोरोना’ लस

Related Posts