IMPIMP

IPL Auction 2021 : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर RCB ने लावली मोठी बोली, ‘इतके’ कोटी मोजून घेतले संघात

by sikandershaikh
glenn-maxwell

चेन्नई : वृत्तसंस्थाIPL Auction 2021 | ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलवर आयपीएल लिलावात जोरदार बोली लागल्याचे दिसून आले. मॅक्सवेलची बेस प्राइज यावेळी 2 कोटी रुपये एवढी होती. पण लिलावात जवळपास सर्वच संघांनी मॅक्सवेलवर बोली लावली होती. मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती.14 कोटी 25 लाख रुपये मोजत अखेर आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी या दोन्ही संघांनी यावेळी एकावर एक बोली लावत मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान देण्याचा प्रयत्न केला होता. गेल्यावर्षी मॅक्सवेलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-20 मालिकेत मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे यावेळी मॅक्सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचे पाहायला मिळाले.

मॅक्सवेल बाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला म्हणाला होता की, जर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरचा दबाव कमी करायचा असेल तर आरसीबीच्या संघाने मॅक्सवेलला स्थान द्यायला आहे. तसेच विराट कोहलीने संघासाठी सलामीला येणे गरजेचे आहे. पण कोहली आणि संघ व्यवस्थापन यांचा निर्णय नेमका काय होतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. कोहलीने देवदत्त पडीक्कलबरोबर जर सलामी दिली, तर त्याच्याकडे डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल असे दोन पर्याय राहणार आहेत. मॅक्सवेलची कामगिरी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली होऊ शकते, असे मला वाटते, असे तो म्हणाला.

Related Posts