IMPIMP

Mithali Raj @10,000 : मिताली राजने घडवला इतिहास, रेकॉर्ड क्विनचे नवे विक्रम, मोडणे सहज शक्य नाही, ठरली पहिली भारतीय

by bali123
mithali raj 10000 international runs list record set indian legend

लखनऊ : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजने ( mithali raj ) शुक्रवारी (दि.12) इतिहास घडवला आहे. 38 वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी कामगिरी करणारी मिताली mithali raj ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर जगात दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वन डेत हा विक्रम केला आहे. इंग्लंडची चार्लोट एडवर्ड ही मितालीच्या पुढे असून, चार्लोटला मागे टाकण्यासाठी मितालीला 299 धावांची गरज आहे.

मितालीची आजपर्यंतची कामागिरी
मिताली राजने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने 212 वन डे सामने खेळले आहे. या सामन्यात तिने 6974 धावा केल्या आहेत. 89 ट्वेंटी-20 सामन्यात 2364 आणि 10 कसोटी सामन्यात 663 धावा केल्या आहेत. कसोटी आणि वन डेत तिनं 50+ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर टी-20 मध्ये 37.52 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

तर मिताली जगातील पहिली महिला खेळाडू बनेल
वन डे क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. महिला क्रिकेटपटूमध्ये सध्या मिताली अग्रस्थानी असून, तिला 7 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी केवळ 26 धावांची गरज आहे. असे केल्यास ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनेल की जिने वन डे क्रिकेटमध्ये 7 हजार धावा केल्या आहेत.

दोन विश्वकप खेळणारी पहिली भारतीय कर्णधार
मिताली राज हिच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. दोन वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम सामने खेळणारी पहिली भारतीय महिला कर्णधार आहे. मितालीने 2005 आणि 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम सामने खेळले आहेत. याशिवाय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम तिच्याच नावावर आहे. तिने 54 अर्धशतकं झळकावली आहेत, तर इंग्लंडच्या एडवर्डने 46 अर्धशतकं केली आहेत.

द्विशतक झळकवणारी पहिली भारतीय खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये मिताली राजने द्विशतक झळकावले आहे. कसोटीत द्विशतक झळकवणारी मिताली पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे, तर जगात सातवी खेळाडू आहे. मितालीने 2002 मध्ये इंग्लंड विरुद्ध 214 धावा केल्या होत्या.

सलग 7 अर्धशतक झळकवणारी एकमेव
मिताली राजने वन डे क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतकं झळकावली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तिनं वन डे क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात शतक झळकावून पदार्पणात शंभर धावा करणाऱ्या युवा महिला खेळाडूचा मान पटकवला. अद्याप हा विक्रम तिच्याच नावावर आहे.

अधिक काळ क्रिकेट खेळणारी पहिली महिला खेळाडू
मिताली राज 20 वर्षांहून अधिक काळापासून क्रिकेट खेळत आहे. 20 वर्षांहून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी ती पहिली महिला आणि 200 वन डे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मिताली राजने ट्वेंटी-20 मध्ये 2000 धावा करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

तणावाच्या दिवसांमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, डोक राहिल एकदम शांत, जाणून घ्या

Related Posts