IMPIMP

कौतुक करावं तेवढं कमी ! मिताली राज वर्षभरापासून करतेय रिक्षा चालकांना भरघोस मदत

by sikandar141
mithali raj wins heart she has been helping rickshaw drivers last one year

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन – गतवर्षापासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेक क्षेत्रातील नागरिकांना खूप मोठा फटका बसला. हातावर पोट असलेल्या अनेकांचे तर दोनवेळच्या जेवणाचे हाल झाले आहेत. अशा लोकांची मदत करण्यासाठी देशातील अनेक सेलिब्रिटी, खेळाडूनी पुढाकार घेतला. ते आज आपापल्या पातळीवर मदत करत आहेत. यात आता भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj)  हिचाही समावेश झाला आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

मिताली राजनं गेल्या वर्षभरापासून रिक्षाचालकांना मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून भारताच्या महिला क्रिकेट संघाची दमदार खेळाडू मिताली राज गरजू रिक्षाचालकांना सढळहस्ते मदत करत आहे. मिताली राज हिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. यात तिच्या अनुपस्थितीत तिचे वडील तिचं कार्य सुरू ठेवत आहेत. आपल्या अनुपस्थितीत वडील मदतीचं कार्य सुरू ठेवत असल्याचा आनंद मितालीनं सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. रिक्षाचालकांना आर्थिक मदतीसह रेशन म्हणजेच तांदुळ, गहू आणि इतर खाद्यपदार्थांचं वाटप केलं जात आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक रिक्षाचालकांची गैरसोय झाली आहे. धंदा बुडाल्यानं अनेकांवर रिक्षा विकण्याचीही वेळ आली आहे. हे कळताच मितालीनं गेल्या वर्षभरापासून गरजू रिक्षाचालकांना मदत करण्याचा वसा घेतला आहे. मिताली राजनं घेतलेल्या पुढाकाराचं सर्वस्तरातुन कौतुक केलं जात आहे. तिच्या परिसरातील रिक्षाचालक देखील मितालीचे आणि तिच्या वडिलांचे ऋणी असल्याचं सांगतात. मिताली राज हिचे वडील रिक्षाचालकांना मदत म्हणून किराणा सामान देत असल्याचं छायाचित्रांमध्ये दिसून येतं.

“कोरोनाच्या संकटात गरजूंना मदत व्हावी या उद्देशानं माझे वडील रिक्षाचालकांना आर्थिक आणि रेशन स्वरुपात मदत करत आहेत. गेल्या वर्षापासून हे मदतकार्य मी सुरू केलं आणि माझ्या अनुपस्थितीत माझे वडील हे काम पुढे नेत आहेत”, असं मितालीनं म्हटलं आहे.

Also Read :

फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिस देतंय पैसे दुप्पट करण्याची सुवर्णसंधी, आजच करा 1000 रूपयांची गुंतवणूक अन् मिळवा लाखोंचा लाभ

Summer Food For Skin : उन्हाळ्यात डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश अन् मिळवा यंग आणि हेल्दी त्वचा

पुण्यातील माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED करणार बारमालकांची चौकशी, 5 जणांना समन्स

Related Posts