IMPIMP

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केलेल्या भारतीय गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा

by sikandershaikh
vinay-kumar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार (vinay kumar) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटकचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विनय कुमार यानं आपल्या ट्विटर वरून याबाबत माहिती दिली आहे.

विनय कुमार (vinay kumar) याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. विनय कुमारच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघानं रणजी कर्नाटक देखील जिंकलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विनय कुमारनं 41 सामने खेळले आहेत. यात 49 विकेट घेतल्या आहेत. विनय कुमारच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारताचे माजी प्रिशक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही विनय कुमारचं कौतुक केलं आहे.

2010 साली विनय कुमारनं भारतीय संघात पदार्पण केलं होतं. रोहित शर्मानं याच सामन्यात आपलं पहिलं वहिलं एकदिवसीय शतक ठोकलं होतं. महत्त्वाची बाब अशी की, 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या भारत सामन्यात तो निळ्या जर्सीत खेळताना दिसला होता. रोहित शर्मानं याच सामन्यात वादळी द्विशतकी खेळी केली होती.

दरम्यान विनय कुमारसाठी त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना वैयक्तिक पातळीवर काही खास ठरला नव्हता. 9 षठकांमध्ये त्यानं 100 हून अधिक धावा दिल्या होत्या.

Related Posts