IMPIMP

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

by bali123
quinton de kock will miss first few matches ipl 2021 he has international duties pakistan series

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – आयपीएल (Indian Premier League – IPL) च्या 14 व्या पर्वाला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. 5 वेळा विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात पहिला सामना होणार आहे. अशात आता गुरुवारी मुंबई इंडियन्सला काहीसं टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सला पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळं मोठा फटका बसला आहे. गुरुवारी पाकविरुद्धच्या वन डे आणि ट्वेंटी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली. यामुळं रोहित शर्माच्या संघाचं टेन्शन आता वाढलं आहे.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

नेमकं काय झालं ?
आफ्रिकेनं 3 वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात क्विंटन डी कॉक, डेव्हिड मीलर, लुंगी एनगिडी, अॅनरिच नॉर्ट्झे, कागिसो रबाडा यांचा समावेश केला आहे. 2 व 7 एप्रिल या दिवशी वन डे सामने होणार आहेत. यानंतर 10, 12, 14 व 16 एप्रिल अशी 4 सामन्यांची ट्वेंटी 20 मालिका होणार आहे. डी कॉकचा वन डे संघात समावेश केल्यान तो 7 एप्रिल पर्यंत राष्ट्रीय कर्तव्यावर आहे आणि त्यानंतर आयपीएल ipl साठी भारतात येईल. परंतु कोरोनामुळं त्याला किमान 7 दिवस क्वारइंटाईन व्हावं लागेल आणि त्यामुळं मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकेल.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

ख्रिस लीनला मिळेल संधी
मुंबई इंडियन्सचा बॅकअप सलामीवीर ख्रिस लीन मुंबईत दाखल झाला आहे. डी कॉकच्या अनुपस्थितीत तो रोहित शर्मा सोबत सुरुवातीच्या काही सामन्यांना सलामीला उतरू शकतो. फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस यांचा वन डे किंवा ट्वेंटी 20 संघात समावेश न केल्यानं ते आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून उपलब्ध होणार आहेत.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians full Squad) – रोहित शर्मा, सौरभ तिवारी, राहुल चाहर, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, इशान किशन, आदित्य तारे, मोहसिन खान, अनमोलप्रीत सिंग, ख्रिल लीन, धवल कुलकर्णी, क्विंटल डी कॉक, अनुकूल रॉय, कीरोन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव.

आयपीएल लिलावता खरेदी केलेले खेळाडू (IPL Auction 2021) –
1)
नॅथन कोल्टर नायर – 5 कोटी
2) अॅडम मिल्ने – 3.2 कोटी
3) पियुष चावला -2.4 कोटी
4) जेम्स निशम – 50 लाख
5) युधवीर चरक – 20 लाख
6) मार्को जॉन्सेन – 20 लाख
7) अर्जुन तेंडुलकर – 20 लाख

हेही वाचा

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts