IMPIMP

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

by bali123
road safety world series yuvraj singh hits four sixes in over for india legends

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – एक वेळ अशी होती कि युवराज सिंग yuvraj singh हा भारतीय टीमचा अविभाज्य भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज सिंग yuvraj singh याची रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुफानी खेळी पाहायला मिळाली. या सिरीज मध्ये युवराज इंडिया लिजेंड संघामधून खेळत आहे. काल वेस्ट इंडिज लिजेंड आणि इंडिया लिजेंड या संघामध्ये सेमी फायनलचा सामना झाला.

या सामन्यामध्ये युवराज सिंग yuvraj singh याने २० चेंडूत ४९ धावा ठोकल्या. यामध्ये त्याने एका ओव्हरमध्ये ४ षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे इंडिया लिजेंडनी हा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला. युवराजने आपल्या संपूर्ण खेळीत २० चेंडूत एक चौकार आणि सहा षटकरांसह ४९ धावा केल्या. त्याने या वेळी ५ चेंडूंमध्ये ४ षटकार लगावत २००७ टी २० वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ड ब्रॉडला लगावलेल्या ६ चेंडूमध्ये ६ षटकार लगावल्याची आठवण करून दिली. त्याची कालची खेळी बघून काही वेळासाठी युवराज पुन्हा एकदा सहा षटकारांच्या त्या विक्रमाची पुनरावृत्ती करतो का काय याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.

या सामन्यांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ४२ चेंडूत ६५ धावा, भारताचा एकेकाळचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने १७ चेंडूत ३५ धावा, यानंतर कैफने २१ चेंडूत २७, युसूफ पठाणने २० चेंडूत ३७ धावा आणि युवराजने २० चेंडूत ४९ धावा करत इंडिया लिजेंड संघाला २१८ धावांचा डोंगर उभा करून दिला. ही धावसंख्या या सीरिजमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर इंडिया लिजेंडच्या बॉलरनी कमाल दाखवत हा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. दरम्यान १९ मार्चला श्रीलंका लिजेंड आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड यांच्यात दुसरा सेमी-फायनल सामना होणार आहे. यांच्यामध्ये जो जिंकेल तो आणि इंडिया लिजेंड या संघामध्ये अंतिम सामना होणार आहे.

‘मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’, मनसेचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा

Related Posts