IMPIMP

Ind vs Eng : दुसर्‍या वनडेच्या पूर्वी टीम इंडियाला झटका, सीरीजमधून बाहेर गेला ‘हा’ स्टार फलंदाज

by bali123
shreyas iyer has been ruled out of the remaining matches of the india england odi series

नवी दिल्ली : इंग्लंडविरूद्ध वनडे सीरीजच्या दुसर्‍या मॅचपूर्वी टीम इंडियाला झटका बसला आहे. टीमचा फलंदाज श्रेयस अय्यर shreyas iyer खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सीरीजच्या उर्वरित मॅचमधून बाहेर गेला आहे. त्याला ही दुखापत पहिल्या वनडे मॅच दरम्यान झाली होती. श्रेयस अय्यरच्या shreyas iyer डाव्या खांद्याचे हाड फिल्डिंगच्या दरम्यान सरकले होते.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

श्रेयस shreyas iyer दुखापतग्रस्त झाल्यानंतर बीसीसीआयने म्हटले होते की, श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याचे हाड फिल्डिंगच्या दरम्यान 8 व्या ओव्हरला सरकले होते. त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे आणि तो या मॅचमध्ये पुढे खेळू शकणार नाही. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर जॉनी बेयरस्टोच्या शॉटवर श्रेयसने चेंडू आडवण्यासाठी झेप घेतली. तो वेदनेने विव्हळताना सुद्धा दिसला होता.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

टीमचे फिजियो नितिन पटेल त्याच्या मदतीसाठी मैदानावर पोहचले आणि नंतर त्याला नेण्यात आले. श्रेयस अय्यरच्या shreyas iyer ठिकाणी शुभमन गिल मैदानात फिल्डिंग करण्यासाठी उतरला होता. श्रेयसच्या आयपीएल-14 च्या पहिल्या सत्रात खेळण्याबाबत सुद्धा साशंकता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, श्रेयस आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स मागील आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहचली होती. श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंत, ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ किंवा सीनियर ऑफ स्पिनर आर. अश्विनकडे सोपवली जाऊ शकते.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

26 मार्चला पुण्यात खेळवली जाईल दुसरी वनडे
भारत आणि इंग्लंडमध्ये वनडे सीरीजची दुसरी मॅच 26 मार्चला खेळवली जाईल. हा सामना पुण्यात होईल. तीन मॅचच्या सीरीजमध्ये भारत 1-0 ने पुढे आहे. भारताने इंग्लंडला पहिल्या मॅचमध्ये 66 धावांनी पराभूत केले होते भारतीय टीमने पहिली फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 317 धावा केल्या. यानंतर इंग्लंडची टीम 251 धावांवर ऑल आऊट झाली. 98 धावांची खेळी करणारा भारतीय ओपनर शिखर धवनला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाले.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts