IMPIMP

144 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी झाला होता कसोटी क्रिकेटचा जन्म, रेकॉर्ड बुकचा ’बादशाह’ बनला होता ‘हा’ फलंदाज

by pranjalishirish
the-day-test-cricket-began-the-match-between-australia-and-england-at-the-mcg-tspo

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटची Cricket अधिकृत सुरुवात 1877 मध्ये आजच्या दिवशी (15 मार्च) झाली होती. मेलबर्न क्रिकेट Cricket ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात उदयास येत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने जुन्या इंग्रज दिग्गजांचा सामना केला होता. मजेशीर बाब म्हणजे या कसोटी सामन्याची कोणतीही कालमर्यादा ठरवलेली नव्हती आणि दोन संघांना दोन-दोन डाव खेळायचे होते, मग यासाठी कितीही दिवस लागले तरी चालतील. हा सामना 15 ते 19 मार्चपर्यंत चालला. सुरुवातीच्या 3 दिवसाच्या खेळानंतर चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (18 मार्च 1877) विश्रांती दिन ठेवला गेला. यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय नोंदवला होता.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच शतक
कसोटी क्रिकेटच्या Cricket 144 वर्षांच्या इतिहासात हा जादुई आकडा फलंदाजांसाठी मैलाचा दगड ठरत आला आहे. शतकांबाबत बोलायचे तर, हे सत्र चार्ल्स बॅनरमॅनपासून सुरू झाले. त्यांच्या बॅटने कसोटी क्रिकेटच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी शतक केले होते.

पहिली कसोटी धाव बॅनरमॅन यांनी काढली
हा ऐतिहासिक पहिला कसोटी सामना चार्ल्स बॅनरमॅनसाठी अतिशय खास ठरला. बॅनरमॅन इंग्लंडमध्ये जन्मले होते, परंतु न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना त्यांनी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवले. कारण, लहानपणीच त्यांचे आई-वडील ऑस्ट्रेलियात आले होते. बॅनरमॅन यांनी डावाची सुरूवात केली. अल्फ्रेड शॉ यांनी कसोटी सामन्यातील पहिला चेंडू टाकला आणि त्या चेंडूचा सामना बॅनरमॅन यांनी केला होता. पहिली कसोटी धाव बॅनरमॅन यांच्या बॅटने काढली.

बॅनरमॅन यांनी शतक बनवून रचला इतिहास
बॅनरमॅन यांनी यानंतर व्यक्तीगत पन्नासची धावसंख्या गाठली. इतकेच नव्हे, त्यांनी हे अर्धशतक शतकात बदलून इतिहास रचला. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा पहिल्या शतकाची चर्चा केली जाईल, तेव्हा बॅनरमॅन यांचे नाव सर्वात वर असेल. अखेर हा सलामीचा फलंदाज 165 धावा बनवून रिटायर्ड हर्ट झाला. कारण, बॅनरमॅन यांना दुखापत झाली होती. त्यांच्या बोटाला दुखापत झाली होती.

टीमच्या 245 पैकी 165 धावा स्वत: बनवल्या
बॅनरमॅन यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची धावसंख्या 245 मधील एकट्याने 165 धावा बनवल्या होत्या. म्हणजे कोणत्याही पूर्ण झालेल्या कसोटी डावात टक्केवारीच्या हिशेबाने सर्वाधिक धावा (67.4 टक्के) काढण्याचा आज सुद्धा हा विक्रम कायम आहे. सोबतच ही आजसुद्धा ऑस्ट्रेलियन फलंदाजाची पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावाची उच्च धावसंख्या आहे. परंतु पुढील दोन कसोटीमध्ये बॅनरमॅन 30 धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. पहिल्या कसोटीत 165 आणि 4 धावा केल्यानंतर मेलबर्नमध्येच खेळवण्यात आलेल्या दोन मॅचमध्ये 10, 30, 15 आणि 15 धावाच बनवू शकले.

आजारामुळे बॅनरमॅन यांची कसोटी कारकिर्द अवघ्या तीन कसोटी सामन्यांचीच राहिली, परंतु आपल्या या शतकामुळे त्यांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. त्यांचे भाऊ एलेक यांनी ऑस्ट्रेलियाकडून 28 कसोटी खेळल्या. मात्र ते शतक करू शकले नाही. बॅनरमॅन यांचे वयाच्या 79 व्या वर्षी 1930 मध्ये निधन झाले.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts