IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

by nagesh
lookout notice against former mumbai police commissioner param bir singh

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण काही कमी होईना. त्यातच आता त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली. सिंग हे परदेशात जाऊ नये म्हणून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणेनगर पोलिसांनी सिंग यांच्यासह २८ खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग (thane police commissioner jaijeet singh) यांनी एक विशेष तपास पथक Special Investigation Team (एसआयटी) नियुक्त केले आहे. दरम्यान, परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यानंतर या प्रकरणातील इतर आरोपींविरोधातही लूकआउट नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्रिकेट बुकी सोनू जालान (Cricket bookie Sonu Jalan), रिजाय भाटी आणि केतन तन्ना यांनी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former police commissioner parambir singh) यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा (former police inspector pradeep sharma), राजकुमार कोथमिरे (Rajkumar Kothamire) यांच्यासह काही अधिकार्‍यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप केला होता. तक्रारीनंतर या गुन्ह्यात एकूण 28 जणांना आरोपी करण्यात आले असून त्यात परमबीर सिंग, दीपक देवराज, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एन. टी. कदम आदी आठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेत आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचे अधिकारी आरोपी आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

परमबीर चंदीगडमध्ये?

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करुन राज्य गृहरक्षक दलाचा पदभार देण्यात आला होता. मात्र त्यांनी पदभार न स्वीकारता सुट्टीवर गेले. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुट्टीवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून ते चंदीगढमध्ये (chandigarh) असल्याचे समजते. 5 मेपासून वैद्यकीय रजेवर जाताना परमबीर यांनी राज्य पोलीस मुख्यालयाला चंदिगढमधील एका स्थानिक रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर केले आहे.

Web Title :- lookout notice against former mumbai police commissioner param bir singh

हे देखील वाचा :

Asteroid | पृथ्वीवर विध्वंस करू शकतो अ‍ॅस्टरॉईड बेन्नू, NASA ने सांगितले केव्हा होऊ शकते ‘धडक’

RBI Issued Fraud Alert | तुम्ही देखील ‘हे’ नंबर कोणासोबत शेअर केलेत? तर मग व्हा सावध, RBI नं जारी केला अलर्ट; जाणून घ्या

Ayurveda Expert Balaji Tambe | आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे निधन कोरोनाने?

Related Posts