IMPIMP

तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

by nagesh
Aadhaar Card | uidai major changes in aadhaar card related rules know the advantages and disadvantages

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-Pan Card | आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारी पुन्हा एकदा वाढवली आहे. सीबीडीटी (Central Board of Direct Taxes) ने याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. CBDT ने 17 सप्टेंबरला एका ट्वीटमध्ये पॅन-आधार लिंक ( Aadhaar-Pan Card) करण्याची डेडलाइन 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आगोदर ही तारीख 30 सप्टेंबर 2021 होती.

पॅन कार्ड होईल निष्क्रिय
केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करणे जरूरी केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने अंतिम तारखेपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक नाही केले, तर त्याचे पॅनकार्ड आयकर विभाग निष्क्रिय घोषित करणार आहे.

दंड होऊ शकतो
निष्क्रिय पॅनकार्डवरून आयटीआर फाइल करने, बँक अकाऊंट उघडणे आणि पेमेन्ट करण्यासारखी कामे करता येणार नाहीत. जर एखादी व्यक्ती निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डचा वापर करताना आढळली तर त्यास 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

ही आहे आधार-पॅन लिंक (Aadhaar-Pan Card) करण्याची पद्धत

– सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

– तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

– नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

– खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

– सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

– लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

ही आहे ऑफलाइन प्रोसेस
आयकर विभागद्वारे जारी पॅन नंबरला ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे 12 अंकी आधारकार्ड नंबरशी लिंक करता येते.
याशिवाय एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते.
यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

Web Titel :- Aadhaar-Pan Card | pan aadhar link know how to link aadhar pan card in few minutes

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

Pune Crime | पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती 27 वर्षीय महिला, बाळू शिळीमकर म्हणाला – ‘नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तो माझ्यासोबत कर’

Related Posts