IMPIMP

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

by omkar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नेत्यांनी स्वत:च्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले (mp chtrapati sambhaji raje bhosale) यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी खा. संभाजीराजे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला संभाजीराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत एक प्रकारे इशाराच दिला आहे. ताकत पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू असा सूचक इशारा संभाजेराजे भोसले यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

ताकतच पहायची असेल तर…

खासदार संभाजीराजे (mp chtrapati sambhaji raje bhosale) यांनी ट्विटमध्ये म्हटले,
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे.
आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही,
त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे,
कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,
अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी नारायण राणे यांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते राणे ?

गुरुवारी नारायण राणे (narayan rane) यांनी संभजीराजेंवर खोचक टीका केली होती. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यात फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का ? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला होता. राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी इशारा देणारं ट्विट केलं आहे. परंतु त्यांनी ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेता इशारा दिला आहे.

भाजप (bjp) नेत्यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले संभाजीराजे राज्यव्यापी दौरा करत आहेत. परंतु कोरोनाच्या संकटाच्या परिस्थितीत आंदोलन करण्यास त्यांचा विरोध आहे. त्यांनी दोन्ही सरकारवर टीका केली आहे. भाजपचा संभाजीराजेंच्या याच भूमिकेला विरोध आहे. संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कलानं वागत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

Also Read:- 

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

Related Posts