IMPIMP

Akhil Bhartiya Maratha Mahasangh | ‘या’ आरोपानंतर अखिल भारतीय मराठा महासंघात मोठा पेच, महासंघात फूट?

by nagesh
Maratha Reservation | maratha kranti morcha warns tanaji sawant over controversial statement about maratha reservation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन अखिल भारतीय मराठा महासंघाचे (Akhil Bhartiya Maratha Mahasangh) अध्यक्ष असलेले शशिकांत पवार (President Shashikant Pawar) यांनी सोमवारी एक पत्रक काढत महासंघाचे सरचिटणीस असलेल्या राजेंद्र कोंढारे (General Secretary Rajendra Kondhare) यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली. त्यानंतर आज (मंगळवार) राजेंद्र कोंढारे यांनी पदाधिकाऱ्यासमवेत पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेऊन शशिकांत पवार यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार गोठवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सध्या अखिल भारतीय मराठा संघात (Akhil Bhartiya Maratha Mahasangh) उभी फूट पडल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान या दोघांच्या आरोप-प्रत्यारोप यामुळे (allegation) अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात सर्वसाधारण सभा (General Body Meeting) झाली. यावेळी शशिकांत पवार यांनी नियमबाह्य पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करुन नियुक्त्या रद्द केल्या. त्यामुळे शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार गोठवण्यात आल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवर्ती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास (Building redevelopment) गैरव्यवहाराबद्दल सभेला लेखी माहिती देऊन, संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार व नुकसानीची नोंद घेऊन शशिकांत पवार यांचे अध्यक्षपाचे सर्व अधिकार गोठवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Web Title :- Akhil Bhartiya Maratha Mahasangh allegations continue pune news

हे देखील वाचा :

Pune News | मुसळधार पावसाचा मंगळवार पेठेतील काही भागाला फटका; सभागृह नेते गणेश बिडकर, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना

High Cholesterol Symptoms | तुमच्या शरीरात वाढतोय का कोलेस्ट्रॉल?, पायांच्या ‘या’ 4 लक्षणांवरून जाणून घ्या

Related Posts