IMPIMP

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Amruta Fadnavis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं गेलं. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने आणि दगडफेक देखील केली. नंतर पोलिसांनी राणेंना अटक करून महाड येथे नेण्यात आले. नारायण राणेंना अटक केल्यांनतर देखील राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. मात्र, रात्री उशीरानंतर राणेंना महाड कोर्टाने (Mahad Court) दिलासा दिला. राणेंना जामीन मंजूर होताच भाजपकडून (BJP) जोरदार जल्लोष करण्यात आला. या घडामोडीवरून राजकीय वर्तुळात टीकाटिपणी होताना पाहायला मिळाल्या. मात्र, आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या की, कोणताही व्यक्ती जेंव्हा स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपड करत असतो, तेंव्हा तो खरा राजा नसतो. अशा शब्दात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी टीकेचे बाण सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) वारंवार टीकेची झोड अमृता फडणवीस या उठवत असतात. दरम्यान, काल झालेल्या घडामोडीवरून अनेक भाजप नेते आक्रमक होत शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. तसेच, आज भाजपचे नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

ज्या पद्धतीने राणे साहेबांना अटक केलीय त्यामध्ये 3 गोष्टी प्रमुख स्पष्ट होतात की, IPS अधिकाऱ्यांवर सरकारमधील मंत्र्यांचा दबाव दिसून येतो.
दुसरं असं की, अनिल परब गृहमंत्री नाहीत, तरीही आधीच मंत्रीमहोदय सांगतायत की अटकपूर्व जामीन नाकारण्यात येणार.
त्यामुळे यात मंत्र्यांचा हस्तक्षेप असण्याची शक्यता दाट आहे.
या सर्व प्रकरणामध्ये अंतिमत: IPS अधिकारी केंद्राला जबाबदार असतात.
राज्याचे एक मंत्री निवाडा जाहिर करतात, हे प्रकरण संशयास्पद आहे.
त्यामुळे या प्रकरणावरून या सर्वांची CBI चौकशी का होऊ नये, असं आशिष शेलार म्हणाले.

Web Title : Amruta Fadnavis | amruta fadnavis criticizes cm without naming him on narayan rane row

हे देखील वाचा :

Pune Railway Police | प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत चोर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात, 4 गुन्हे उघडकीस

Beed Crime | पैशांसाठी मुलानेच जन्मदात्या वडिलांची केली हत्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts