IMPIMP

Amruta Fadnavis | ‘मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, विचार मांडते’; अमृता फडणवीस यांनी उलगडलं त्यांचं जगण्याचं आणि कामाचं पॅशन

by nagesh
Amruta Fadnavis | Amruta Fadnavis says, I am independent person, my songs, my expression is mine free individual

सरकारसत्ता ऑनलाइनAmruta Fadnavis | माझ्याकडे लोक भाजप नेत्याची पत्नी म्हणून पाहत असतात. पण, मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्त होते. बोलते, विचार मांडते. ते माझेच असतात. मला जे म्हणायचं तेच मी ट्विटरवर लिहिते. अगदी योग्य पद्धतीने ते विचार मी मांडत असते. परंतु लोक त्या गोष्टींचं राजकारण करतात.पण मला जे हव तेच मी मांडत असते. गाण्यांचाही तसेच आहे. गाणं म्हणते, विचार मांडते म्हणून लोक माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहतात. गाणं हे माझं पॅशन आहे. एक बँकर, गायिका, सामाजिक कार्यकर्ती, देवेंद्र फडनवीस यांची पत्नी, दिविजाची आई हे सारं मिळून ‘मी’ मी आहे. यापैकी एकही गोष्ट नसेल तर मी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कशी असेल? त्या सर्व मिळून माझी ‘एक ओळख’ बनते..असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांच्या गणेशवंदना या गाण्याच आगमन झालं. या नव्या भक्तीमय गाण्यातूनही त्या स्त्रीचं खंबीर, कर्तव्यतत्पर, आनंदी आणि प्रेमळ रुप मांडत बाईच्या जगण्याची एक गोष्ट गुंफत आहेत.यानिमित्त एका दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या जगण्याचं आणि कामाचं पॅशन याबाबत गुपित उलगडलं आहे.

अमृत फडणवीस म्हणाल्या, आपले विचार व्यक्त करण्यात महिला मागे राहतात हेच महाराष्ट्रात कमी आहे. किंवा लोक त्यांना विचार मांडून देत नाही. मला वाटतं कोणत्याही स्त्रीने असे मागे राहण्याची गरज नाही. महिलांनी काय करावे आणि काय करू नये याचे बंधारे बांधले आहेत. महिलांनी ते बंधारे तोडणं गरजेचं आहे. त्यामुळेच लोकांना ट्रोलिंगमध्ये मजा येते. असं मला वाटत. खराब कमेण्ट‌्समुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष दिसून येतो. पण मी त्याचा विचार करत नाही कारण मला माहित आहे कि मी काय करत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

माझ्या क्षमतेनुसारच मी सकारात्मकतेने करते. माझं गाणं, माझं काम लोकांसमोर आणायचं म्हणून करते. त्यातून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळावी, त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पैलू लोकांसमोर यावेत, त्यांना उमेद मिळावी म्हणून मी धडपडते आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला जे करणं शक्य आहे तेवढे मी करत आहे. या सर्वांमध्ये देवेंद्रजींचे जे स्थान आहे, त्यामुळे माझ्या व्यक्त होण्याकडे कायम राजकीय हेतूने पाहिले जाते पण मी जे काही मांडते ते माझे व्यक्तिगत विचार आहेत. जे ठरवलं ते खंबीरपणे करत राहण्याची हिंमत आपल्याला आपल्या आईकडून लाभल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घरातूनच मला गाण्याची आवड लाभली.
माझी आजी डॉक्टर होतीच पण त्याचबरोबर ती एक उत्तम अभिजात गायिका सुद्धा होती.
तेच माझ्या बाबांचे. ते ही गाणे शिकलेत. ते गाणं माझ्याकडे आलं.
माझ्या गुरुंकडे मी शिकते आहे. ध्यान धारणा करते. त्यातून माझ्या गाण्याची आवड आकार घेतेय.
त्यामुळे ‘माझं गाणं हे पॅशन आहे. माझी आई अत्यंत खंबीर स्त्री होती. माझ्या मनात तिची ताकद, खंबीरपणा घर करुन राहिला आहे. मला आपल्या अवतीभोवती, आपल्या माणसात अशी शक्तीस्थानं दिसतात. त्यातून प्रेरणा मिळते. त्यामुळे आपण जे करतोय ते योग्यच आहे. हि सकारात्मकता आणि इच्छा असेल तर आपल्याला कुणीही थांबवू शकत नाही. असंही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :  Amruta Fadnavis | Amruta Fadnavis says, I am independent person, my songs, my expression is mine free individual

हे देखील वाचा :

BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 87 जागांसाठी भरती, जाणून घ्या

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने ‘लाच’ देण्याचा प्रकार, जाणून घ्या प्रकरण

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात ‘अज्ञात’ मर्सिडीज कार घुसली, चालकास अटक

Related Posts