IMPIMP

anti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेच्या (pune municipal corporation) महिला अधिकाऱ्यास पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे 30 जून रोजी महिला अधिकारी सेवानिवृत्त होणार होत्या. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) केलेल्या धडक कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Assembly elections | आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…

मंजुषा इधाटे असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे (Shivajinagar Police Station)येते गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या महापालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.
दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत. ते प्रकरण महिला अधिकारी यांच्याकडे होते.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत त्यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Chhatrapati Shahu Maharaj | अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…

या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महिला अधिकारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ देखील व्यक्त होत आहे.

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस

Related Posts

Leave a Comment