IMPIMP

Anti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
Anti-Corruption | yaval municipal corporation chief baban tadvi arrested while accepting bribe

जळगाव न्यूज (Jalgaon News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online):   जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील (Yaval taluka) नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे कंत्राटदाराकडून 28 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption) जाळ्यात सापडले आहे. बबन तडवी असे त्या मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. साठवण बंधार्‍याच्या कामांसाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्‍या प्रकरणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption) त्यांना रंगेहात पकडले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी (Baban Tadvi) यांनी कंत्राटदाराकडून पैशांची मागणी करत साठवण बंधार्‍याचे काम मिळवून देतो असे सांगून लाच मागितली होती. याबाबत संबंधीत कंत्राटदाराने जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली.
यावरून त्याचा तपास केला. ACB च्या पथकाने यावल नगरपालिकेत सापळा रचला.
दुपारी एकच्या दरम्यान मुख्याधिकारी तडवी हे कंत्राटदाराकडून 28 हजार रूपयांची रक्‍कम घेत असताना रंगेहाथ पकडले.
तडवी यांना अटक केल्‍यांतर तेथील या कारवाईमुळे नगरपालिका परिसरात खळबळ माजली आहे.

या दरम्यान, मुख्याधिकारी बबन तडवी (Baban Tadvi) यांच्याविरूद्ध अनेक तक्रारी होत्‍या.
त्‍यांवर आरोपही केले होते. यातच काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नगरपालिका सदस्‍यांकडून वारंवार करण्यात आली होती.
यातच आता आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून (ACB) झालेल्‍या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title : Anti-Corruption | yaval municipal corporation chief baban tadvi arrested while accepting bribe

हे देखील वाचा :

Weather Update | कोकणात पावसाचं पुनरागमन; पुणे, साताऱ्यात हाय अलर्ट जारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

Related Posts