IMPIMP

Baramati News | बारामतीतील दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट

by nagesh
Baramati News | Household kits to 75 families through Durgabhramanti Social Foundation in Baramati

बारामती न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन  – Baramati News | राज्यात अथवा देशात कोणतेही संकट आले की बारामतीकर (Baramati News) मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतात. नुकत्याच झालेल्या जलप्रलयानंतर सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही बाब लक्षात घेत बारामतीच्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने (Durgabhramanti Social Foundation)पुढाकार घेत ‘एक हात सामाजिक जबाबदारीचा’ या उपक्रमांतर्गत वाई तालुक्यातील जोर या गावातील ग्रामस्थांना मदत पोहोच केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील काही दिवसांपूर्वी सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कोकणात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागांमध्ये शासकीय मदतीबरोबरच विविध सामाजिक संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. बारामतीतील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जोर गावातील ७५ कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट देण्यात आले.

अभिजीत घाडगे, अविनाश बांदल, अनिकेत पवार, तुषार लोखंडे, चंदू लोंढे, सतीश झारगड, राकेश दुर्गाडे, अक्षय परकाळे आदीनी प्रत्यक्ष जोर गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली.
त्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना गृहपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
संकट काळात दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनने दिलेल्या मदतीबद्दल जोर गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी बारामतीतील विविध दानशूर व्यक्तींसह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हातभार लावला.

Web Title : Baramati News | Household kits to 75 families through Durgabhramanti Social Foundation in Baramati

हे देखील वाचा :

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन; पुनावळे येथील घटना

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

Numerology and Career | स्वतःच्या जन्म तारखेवरून निवडा योग्य करियर, आकड्यांचा जीवनावर होणार परिणाम माहित आहे का?, जाणून घ्या

Related Posts