IMPIMP

Chhagan Bhujbal | ‘राणे, राणा आणि राज हे बरोबर ‘RRR’ – छगन भुजबळ

by nagesh
Chhagan Bhujbal | chhagan bhujbal s reaction on satyajit tambe s nashik election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chhagan Bhujbal | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,” असं म्हणत ”राणे, राणा आणि राज हे RRR असंच जुळलेलं दिसतय.” असं देखील मोठं विधान मंत्री भुजबळ यांनी केलं. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”कायद्यासमोर कोणीही मोठं नाही. नारायण राणे (Narayan Rane) हे केंद्रीयमंत्री आहेत, परंतु कुठेतरी एका शब्दात ते अडकले आणि त्याबरोबर त्यांना मग अटक व्हावी लागली. राणे झाल्यानंतर मग राणा दाम्पत्य, ते खासदार आणि आमदार आहेत. परंतु न्यायालयानेच जे काही त्यांना फटकारलं, की तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार कोणी दिला ? दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन या सगळ्या गोष्टी करायचा. तुम्ही स्वत: कायदे बनवणारे आहात, तर तुम्ही असं कसं काय करू शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की आज 10 – 15 दिवस झाले, त्यांना जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. राणे काय, राणा काय आणि आता राज काय. हे बरोबर RRR असंच जुळलेलं दिसतय.” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे.

पुढे छगन भुजबळ म्हणाले, ”ज्यावेळी ते अशी काही विधानं करतात, त्यावेळी हा धोका पत्कारून ते बोलत असतात. त्यामुळे असं होऊ शकतं. अटक होईल की नाही मला काही माहिती नाही. परंतु पुढची जर काही कारवाई करायची असेल, अजामीनपात्र असेल तर कोर्टात जामीन मिळेलच. आता त्यातून लोकांमध्ये काय संदेश जाईल. पक्षासाठी उपकारक संदेश जाईली की अपकारक जाईल ? हे थोडसं आपल्याला पाहावं लागेल, त्यानंतर ते लक्षात येईल.” असं ते म्हणाले.

Web Title :- Chhagan Bhujbal | rane rana and raj are right rrr chhagan bhujbals statement

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे ठाम ! ‘अभी नही तो कभी नही’; देशातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन ?

Chitra Wagh To Ajit Pawar | चित्र वाघ यांचा अजित पवारांना सवाल; म्हणाल्या – ‘दादा…’

Shivsena MP Sanjay Raut | महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव ?; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Related Posts