IMPIMP

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray formal interaction with journalists talk on shivsena and bjp alliance in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | जर का ठरल्या प्रमाणे सर्व काही झालं असतं तर मग मी माझीही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि एव्हाना मी माझ्या फोटोग्राफीचं प्रदर्शन देखील भरवलं असतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युतीवर भाष्य केलं. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (सोमवारी) माध्यमांशी औपचारिक संवाद साधला.

त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलवलं असतं.
असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायची कोणतीही योजना, इच्छा नव्हती असं यातून सूचित केलं आहे.
दरम्यान, फोटोग्राफी आणि राजकारणात एक्सपोजिंग महत्त्वाचं असतं आणि नंतर डेव्हलपिंग महत्त्वाचं असतं, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुढे उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला आहे.
फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) नवाब मलिकांनी केला.
त्यावर फडणवीस म्हणाले, नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल.
त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काहीजण म्हणताहेत दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार,
मी वाट पहातोय पाकिस्तानमध्ये कधी बॉम्ब फोडणार आहेत त्याची. असं ते म्हणाले.

Web Title : CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray formal interaction with journalists talk on shivsena and bjp alliance in maharashtra

हे देखील वाचा :

BJP Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र; म्हणाल्या – ‘तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय’

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

Related Posts